Latest Maharashtra State Board (SSC & HSC) 2026-27 Syllabus Digest & Solutions Updated!
Class 6Marathi (Aksharbharati / Sulabhbharati)2026-27 Syllabus

Chapter 4 माहिती घेऊया Solutions

Complete Maharashtra State Board Balbharati & Yuvakbharati textbook solutions for Chapter 4 माहिती घेऊया. Step-by-step solved exercises, numerical problems, and digest answers.

18 Solved Questions2 Diagrams776 words

Maharashtra State Board Class 6 Marathi Solutions Chapter 4 माहिती घेऊया

Marathi Sulabhbharti Class 6 Solutions Chapter 4 माहिती घेऊया Textbook Questions and Answers

1. भारतीय संशोधकांची नावे व त्यांनी लावलेले शोध यांची माहिती घेऊन तक्ता तयार करा. वर्गात लावा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
भारतीय संशोधकांची नावे व त्यांनी लावलेले शोध यांची माहिती घेऊन तक्ता तयार करा. वर्गात लावा.
Solution & Step-by-Step Answer:

भारतीय संशोधक

लावलेले शोध

1. ए. पी. जे. अब्दुल कलाम

अग्नी, पृथ्वी, क्षेपणास्त्र स्वदेशी पद्धतीने बनवले

2. जयंत विष्णू नारळीकर

ब्रहमांड उत्पत्ती शोध – बिग बँग थियरी

3. विक्रम साराभाई

आण्विक उर्जा, इलेक्ट्रॉनिक्स

4. डॉ. जगदीशचंद्र बोस

रेडीयो, सूक्ष्म तरंगांचे प्रकाशिकीवर कार्य

5. डॉ. होमी जहांगीर भाभा

परमाणू उर्जा

2. कोणकोणत्या गोष्टींमध्ये संशोधन व्हावे असे तुम्हांला वाटते? विचार करा व लिहा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
कोणकोणत्या गोष्टींमध्ये संशोधन व्हावे असे तुम्हांला वाटते? विचार करा व लिहा.
Solution & Step-by-Step Answer:

3. खालील वाक्याचे वचन बदलून वाक्ये पुन्हा लिहा.
उदा., भिंत कोसळली – भिंती कोसळल्या.

उप्रकम:आंतरजालाचा उपयोग करून डॉ. वसंत गोवारीकर यांची माहिती मिळवा. कोलाज तयार करा.
प्रकल्प:वर्तमानपत्रात शास्त्रज्ञ, संशोधक यांच्याविषयी येणाऱ्या माहितीची कात्रणे काढून चिकटवही बनवा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
खालील वाक्याचे वचन बदलून वाक्ये पुन्हा लिहा. उदा., भिंत कोसळली – भिंती कोसळल्या.
Solution & Step-by-Step Answer:

1. मला कविता आठवली.

आम्हाला कविता आठवल्या.

2. त्याने खुर्ची ठेवली.

त्यांनी खुर्ध्या ठेवल्या.

3. मधू आंबा खा.

मधू आंबे खा.

Marathi Sulabhbharti Class 6 Solutions Chapter 4 माहिती घेऊया Important Additional Questions and Answers

योग्य पर्याय निवडून उत्तरे लिहा.

उत्तर:

एका वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
डॉ. वसंत गोवारीकरांचे पदवीपर्यंतचे शिक्षण कुठे झाले?
Solution & Step-by-Step Answer:
डॉ. वसंत गोवारीकरांचे पदवीपर्यंतचे शिक्षण कोल्हापूरला झाले.
प्रश्न 2 Maharashtra Board Solution
डॉ. वसंत गोवारीकरांनी कोणते तंत्र विकसित केले?
Solution & Step-by-Step Answer:
डॉ. वसंत गोवारीकरांनी अग्निबाणाच्या मोटारीकरिता घन इंधन बनवण्याचे तंत्र विकसित केले.
प्रश्न 3 Maharashtra Board Solution
देशभर कोणती चिंता असते?
Solution & Step-by-Step Answer:
पाऊस केव्हा पडेल? किती पडेल? याची देशभर चिंता असते.
प्रश्न 4 Maharashtra Board Solution
पत्राचे इंग्रजी भाषांतर करण्यासाठी गोवारीकरांनी कोणाची मदत घेतली?
Solution & Step-by-Step Answer:
पत्राचे इंग्रजी भाषांतर करण्यासाठी गोवारीकरांनी मित्राची मदत घेतली.
प्रश्न 5 Maharashtra Board Solution
गोवारीकरांचा कोणत्या दोन गुणांची चुणूक लहानपणीच दिसून आली?
Solution & Step-by-Step Answer:
त्यांच्या कुशाग्र बुद्धिमत्तेची आणि दृढ संकल्पाची चुणूक लहानपणीच दिसून आली.
प्रश्न 6 Maharashtra Board Solution
पदवीपर्यंतच्या शिक्षणानंतर गोवारीकर उच्च शिक्षणासाठी कुठे गेले?
Solution & Step-by-Step Answer:
पदवीपर्यंतच्या शिक्षणानंतर गोवारीकर उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले.
प्रश्न 7 Maharashtra Board Solution
कोणत्या विदयापीठात त्यांनी ‘रासायनिक अभियांत्रिकी’ विषयात संशोधन केले?
Solution & Step-by-Step Answer:
बर्मिंगहॅम विद्यापीठात त्यांनी ‘रासायनिक अभियांत्रिकी’ विषयात संशोधन केले.
प्रश्न 8 Maharashtra Board Solution
संशोधक म्हणून त्यांनी कोठे काम केले?
Solution & Step-by-Step Answer:
इंग्लंडच्या उर्जा संशोधन केंद्रात संशोधक म्हणून काम केले.

खालील प्रश्नांची दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
भारताच्या विज्ञान क्षेत्रातील डॉ. गोवारीकरांनी केलेली कामगिरी लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
विक्रम साराभाईंच्या आग्रहामुळे 1967 साली ते भारताच्या अवकाश संशोधन केंद्रात रुजू झाले. ‘घन पदार्थातील उर्जा’ या विषयाच्या संशोधनासाठी त्यांच्या पुढाकाराने नवा प्रकल्प सुरू करण्यात आला. अग्निबाणाच्या मोटारीकरिता घन इंधन बनवण्याचे तंत्र त्यांनी विकसित केले. मान्सूनच्या अंदाजाची नवी पद्धत शोधून काढली.
प्रश्न 2 Maharashtra Board Solution
शाळेत असताना त्यांना कोणती कल्पना सुचली? त्याची कशी दखल घेतली गेली?
Solution & Step-by-Step Answer:
शाळेत असताना आपण मोटार बनवावी असे त्यांना वाटले. तेराव्या वर्षी त्यांनी अमेरिकेतील हेन्री फोर्डला पत्र लिहून आपली इच्छा कळवली. हेनरी फोर्डला मराठीतील पत्र कळणार नाही म्हणून मित्राच्या मदतीने पत्राचे इंग्रजी भाषांतर केले. हेन्री फोर्डने डॉ. गोवारीकरांच्या पत्राची दखल घेऊन उत्तरही पाठवले. सोबत काही पुस्तके पाठविली.

व्याकरण व भाषाभ्यास:

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
खालील वाक्यांचे वचन बदलून वाक्ये पुन्हा लिहा. उदा. भिंत कोसळली – भिंती कोसळल्या
Solution & Step-by-Step Answer:

1. मीराला पिशवी सापडली.

मीराला पिशव्या सापडल्या.

2. रामने पुस्तक वाचले.

रामने पुस्तके वाचली.

प्रश्न 2 Maharashtra Board Solution
लिंग बदला.

Solution & Step-by-Step Answer:

प्रश्न 3 Maharashtra Board Solution
विरूद्धार्थी शब्द लिहा.

Solution & Step-by-Step Answer:
प्रश्न 4 Maharashtra Board Solution
खालील वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा.
Solution & Step-by-Step Answer:

लेखन विभाग:

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
आंतरजालाचा उपयोग करून डॉ. वसंत गोवारीकर यांची माहिती मिळवा.
Solution & Step-by-Step Answer:
डॉ. वसंत रणछोड गोवारीकर यांचा जन्म 25 मार्च 1933 रोजी झाला. एक भारतीय शास्त्रज्ञ म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन मध्ये ते मुख्य पदावर विराजमान होते. अंतराळ, हवामान, लोकसंख्या विषयांवरचे त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. पद्मश्री व पद्मभूषण या पुरस्करांनी त्यांना सन्मानित केले गेले. 2 जानेवारी 2015 रोजी ते अनंतात विलीन झाले.

माहिती घेऊया Summary in Marathi

पाठ परिचयः

पद्मश्री व पद्मभूषण पुरस्कार प्राप्त असलेले श्री. वसंत गोवारीकर एक भारतीय संशोधक होते. अवकाश संशोधनाच्या मुख्य पदावर कार्यरत असलेले वसंत गोवारीकर 1991 – 1993 च्या काळात पंतप्रधानांचे सल्लागारही होते. अंतराळ संशोधन, हवामान, लोकसंख्या या विविध विषयांवरचे त्यांचे योगदान अमूल्य आहे. प्रस्तुत पाठात त्यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेता येईल.

शब्दर्थ: