Maharashtra State Board Class 10 Marathi Kumarbharti Chapter 12 भरतवाक्य
Marathi Kumarbharti Std 10 Digest Chapter 12 भरतवाक्य Textbook Questions and Answers
कृतिपत्रिकेतील प्रश्न २ (अ) साठी…




(अ) कवींच्या मते मनातील सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून ________________________
(१) सतत परमेश्वराच्या सान्निध्यात राहावे.
(२) सतत परमेश्वराचे नामस्मरण करावे.
(३) सतत आत्मबोध घ्यावा.
(४) चारधाम यात्रा करावी.
कवीच्या मते मनातील सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात, म्हणून सतत परमेश्वराचे नामस्मरण करावे.
(आ) सदंघ्रिकमळी दडो; म्हणजे ________________________
(१) कमळाच्या फुलात चित्त सदैव गुंतो.
(२) कमळातून मधुसेवन करणाऱ्या भुंग्याप्रमाणे सज्जनांच्या पायाशी मन गुंतो.
(३) कमळाच्या व भ्रमराच्या सौंदर्यात मन गुंतो.
(४) कमळात मन लपून राहो.
उत्तर:
सदंघ्रिकमळी दडो; म्हणजे कमळातून मधुसेवन करणाऱ्या भुंग्याप्रमाणे सज्जनाच्या पायाशी मन गुंतो.
प्रश्न 3
Maharashtra Board Solution
खालील गोष्टींच्या बाबतीत कवी परमेश्वराजवळ कोणती विनंती करतात ते लिहा. गोष्टी – विनंती (१) निश्चय – ………………………………… (२) चित्त – ………………………………… (३) दुरभिमान – ………………………………… (४) मन – …………………………………
Solution & Step-by-Step Answer:
गोष्टी – विनंती (i) निश्चय – कधीही ढळू नये. (ii) चित्त – भजन करताना विचलित होऊ नये. (iii) दुरभिमान – सर्व गळून जावा. (iv) मन – मलीन होऊ नये.
प्रश्न 4
Maharashtra Board Solution
खालील ओळींचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा. (१) मति सदुक्तमार्गी वळो – ………………………………… (२) न निश्चय कधीं ढळो – …………………………………
Solution & Step-by-Step Answer:
(१) कुमार्ग सोडून चांगल्या मार्गावर बुद्धी वळवावी, म्हणजेच सत्कार्य करावे. (२) दृढ केलेला निर्धार कधीही विचलित होऊ नये.
प्रश्न 5
Maharashtra Board Solution
काव्यसौंदर्य. (अ) ‘सुसंगती सदा घडो; सुजनवाक्य कानी पडो;’ या ओळींचे रसग्रहण करा.
Solution & Step-by-Step Answer:
आशयसौंदर्य: ‘केकावली’ या काव्यग्रंथाची समाप्ती करताना उपसंहार म्हणून ही ‘भरतवाक्य’ काव्यरचना कविश्रेष्ठ मोरोपंतांनी लिहिली आहे. तनामनातील दर्पण जाऊन सद्गुण कोणते व कसे अंगिकारावे, याबद्दल देवाकडे आतं प्रार्थना केली आहे.
काव्यसौंदर्य: ‘सुसंगती’ म्हणजे चांगल्या, सज्जन व्यक्तीची मैत्री होय. गुणवान व चारित्र्यवान माणसांच्या संगतीत सदैव राहावे, म्हणजे आपली आत्मिक प्रगती व ज्ञानप्राप्ती होते, असा आशय उपरोक्त ओळींमध्ये व्यक्त झाला आहे. ‘सुजनवाक्य’ म्हणजे सुविचारांची धारणा जर केली, तर मन निर्मळ व प्रेमळ होते, असाही सुयोग्य सल्ला मोरोपंतांनी जनसामान्यांना दिला आहे. भाषिक वैशिष्ट्ये: प्रस्तुत ओळींमध्ये सामान्य माणसांना परमार्थांची आवड लागावी, म्हणून दोन वर्तन-नियम सांगितले आहेत. साधकाने चारित्र्यसंपन्न होण्यासाठी उपदेश केला आहे. प्रत्येक चरणात ११+१३ मात्रेची आवर्तने असणारी हे ‘केकावली’ नावाचे मात्रावृत्त आहे. यातील भाषा साधी, सोपी व आवाहक असल्यामुळे हृदयाला। थेट भिडणारी आहे. ‘घडो-जडो’ या यमकप्रधान क्रियापदांमुळे कवितेला सुंदर लय व नाद आला आहे. (आ) ‘स्वतत्त्व हृदया कळो; दुरभिमान सारा गळो;’ या काव्यपंक्तीतील विचारसौंदर्य स्पष्ट करा. सत्संग करून माणसाने सन्मार्गाला लागावे. चांगला मार्ग आचरण्यासाठी बुद्धीला योग्य वळण लावावे. स्वत:मधील स्वतत्त्व मनोमन ओळखावे. आत्मविश्वास वाढवावा. गर्विष्ठपणाचा त्याग करावा. दुरभिमान अजिबात बाळगू नये. आपले मन वाईट विचारांनी मलीन, भ्रष्ट करू नये. मन शुद्ध करावे. आत्मज्ञान वाढवावे. आत्मज्ञानामध्ये सर्व अनिष्ट गोष्टी जाळून टाकाव्यात, अशा प्रकारे विवेकी व प्रगल्भ विचार या चरणांमध्ये कवी मोरोपंत यांनी व्यक्त केला आहे. (इ) सत्प्रवृत्त व्यक्तीची तुम्हाला जाणवलेली वैशिष्ट्ये तुमच्या शब्दांत लिहा. (ई) वाईट गोष्टींचा मोह टाळण्यासाठी तुम्ही कोणते उपाय सुचवाल ते लिहा. Marathi Kumarbharti Class 10 Textbook Solutions Chapter 12 भरतवाक्य Additional Important Questions and Answers प्रश्न. पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती करा: कृती १: (आकलन)
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
आकृती पूर्ण करा:
Solution & Step-by-Step Answer:
– (सराव कृतिपत्रिका-२) सुसंगति सदा घडो; सुजनवाक्य कानी पडो; – (केकावली) कृती २: (आकलन)
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
‘कुशलधामनामावली मावली’ या कवीच्या कल्पनेतील कुशलधामनामावली व मावली यांच्यातील साम्य स्पष्ट करा: (सराव कृतिपत्रिका-२) |
कुशलधामनामावली – मावली (माऊली)
(i) ……………………… – (i) ………………………
(ii) ……………………… – (ii) ………………………
(iii) ……………………… – (iii) ………………………
कुशलधामनामावली – मावली (माऊली)
(i) आश्रयाला आलेल्या लोकांना सावरते. – (i) सन्मार्ग दाखवते.
(ii) संकटकाळी धावून येऊन कृपा करते. – (ii) सर्व लोकांचे कल्याण करते.
कृती ३: (काव्यसौंदर्य)
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
‘कृपा करिशि तूं जगत्रयनिवास दासावरी, तशी प्रगट हे निजाश्रितजना सदा सांवरी।।’ या काव्यपंक्तीतील भावसौंदर्य स्पष्ट करा.
Solution & Step-by-Step Answer:
कवी मोरोपंत यांनी “भरतवाक्य’ या केकावलीमध्ये भक्तिमार्गाने परमार्थसाधना करणाऱ्या साधकांच्या वतीने परमेश्वराकडे करुणा भाकली आहे.
कवी मोरोपंत म्हणतात – हे प्रभो, तुझ्या नामस्मरणाने शरीररूपी घर पावन होवो व कुशल राहो. स्वर्गलोक, इहलोक व पाताळलोक या तिन्ही जगात राहणारे तुझे जे भक्त आहेत, ते तुझे दास आहेत. ते तुला मनोभावे शरण आले आहेत. तुझ्या आश्रयाला आलेल्या या भक्तजनांवर तू तुझा कृपावर्षाव कर, तुझी कृपा प्रगट कर आणि या भक्तांना नेहमी आधार देऊन त्यांचे जीवन सावर. अत्यंत लीन शब्दांत कवींनी परमेश्वराची आर्त आळवणी केली आहे. प्रश्न. पुढील कवितेसंबंधीत्याखाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा: कविता-भरतवाक्य. (मार्च १९) (६) कवितेच्या कवींची लेखनवैशिष्ट्ये: ही कविता आर्या या वृत्तात लिहिलेली आहे. या आर्याची चालही जनमानसात खूप लोकप्रिय झालेली आहे. कर्णमधुर चालीमुळे ही कविता गुणगुणत राहावीशी वाटते. या कवितेत ‘सुजनवाक्य’, ‘सदैनिकमळी’, ‘कुजनविघ्नबाधा’, ‘सदुक्तमार्गी’, ‘स्वतत्त्व’, ‘कुशलधामनामावली’ यांसारखे संस्कृतप्रचुर शब्द आहेत. अशा शब्दांनी भारदस्तपणा येतो. त्याचबरोबर ‘घडो’, ‘पडो’, ‘जडो’, ‘मुरडिता’, ‘इटाने’, ‘ढळो’ यांसारखे अस्सल मराठी शब्दही या कवितेत आढळतात. त्यामुळे आशय सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यास मदत होते. भाषा आवाहक बनते. यमकप्रधानता असल्यामुळे सुंदर लय व खटकेबाज नादमयता निर्माण झाली आहे. (७) कवितेची मध्यवर्ती कल्पना: माणसाने नेहमी सज्जन माणसाच्या संगतीत राहावे. सुवचनांमध्ये सांगितलेले विचार अंगीकारावेत आणि त्यानुसार वागावे. खोटा अभिमान न बाळगता व मोहाला बळी न पडता सत्कर्म करून भक्तिमार्गाचा अवलंब करावा, हा मोरोपंतांनी केलेला उपदेश कवितेच्या केंद्रस्थानी आहे. (८) कवितेतून व्यक्त होणारा विचार: माणसाने सतत परमेश्वराचे नामस्मरण करावे. दुरभिमान, गर्विष्ठपणा, वाईट विचार आपल्या मनातून नष्ट झाले पाहिजेत. चांगल्या विचारांचे वळण लागावे अशी मोरोपंत इच्छा व्यक्त करतात. चांगले वागणे म्हणजे काय, हे समजून घेण्यासाठी सदोदित सज्जनांच्या संगतीत राहावे, लोकांनी सज्जनांचे वागणे, त्यांचे बोलणे, त्यांचे विचार अंगीकारावेत, हा विचार या कवितेत मांडला आहे. (९) कवितेतील आवडलेली ओळ: (१०) कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे: ही कविता मला आवडते. कारण लहानपणापासून मी ती ऐकत आलो आहे. लहानपणी ती पाठही केली होती. आता मोठा झाल्यावर कवितेचा अर्थ कळला आहे. कवितेत चांगले वागण्याचा सल्ला दिला आहे. पण चांगले म्हणजे काय, हे सोप्या पद्धतीने सांगितले आहे. सज्जन माणूस जसे वागतो, बोलतो, विचार करतो, तसे म्हणजे चांगले, इतकी सोपी कल्पना वापरून आपले म्हणणे सांगितले आहे. पण या कवितेतील संस्कृतप्रचुर शब्दांमुळे अर्थ कळण्यात अडचणी येतात. ही एक कवितेविषयी नावड निर्माण करणारी बाब आहे. (११) कवितेतून मिळणारा संदेश: नेहमी संतसज्जनांच्या संगतीत राहावे. त्यांच्या सहटासामुळे चांगले वागण्याचे दर्शन घडते. त्यांच्याप्रमाणे वागण्याची प्रेरणा मिळते. त्यांच्या विचारांसारखे विचार आपण अंगीकारू लागतो. तसेच नेहमी देवाचे नामस्मरण करीत राहावे. म्हणजे वाईट कल्पना, वाईट विचार आपल्या मनाला शिवत नाहीत… व्याकरण व भाषाभ्यास (कृतिपत्रिकेतील प्रश्न ४ (अ) आणि (आ) यांसाठी… व्याकरण घटकांवर आधारित कृतीः पुढील सामासिक शब्दांचा विग्रह करा: २. अलंकार: पुढील आकृतीवरून अलंकार ओळखा व एक उदाहरण दया: ३. वृत्त: पुढील ओळीचा लगक्रम लिहा:
४. शब्दसिद्धी: (२) पुढील शब्दांना ‘आवली’ प्रत्यय लावून शब्द तयार करा: ५. सामान्यरूप: पुढील शब्दांची सामान्यरूपे लिहा: भाषिक घटकांवर आधारित कृती: १. शब्दसिद्धी: (१) समानार्थी शब्द लिहा: (२). विरुद्धार्थी शब्द लिहा: (३) पुढील शब्दांचे दोन अर्थ लिहा: (४) पुढील शब्दांच्या अक्षरातून चार अर्थपूर्ण शब्द लिहा: २. लेखननियम: ३. विरामचिन्हे: ४. पारिभाषिक शब्द: (ii) Lyric – ……………………. (iii) Magazine – ……………………. (iv) Trade Mark – ……………………. ५. अकारविल्हे/ भाषिक खेळ पुढील शब्द अकारविल्हेनुसार लिहा: भरतवाक्य Summary in Marathi कवितेचा भावार्थ दृढ निर्धार कधीही ढळू देऊ नये. वाईट माणसांचे विघ्न टळून जाऊ दे, त्यांच्या अडचणीची बाधा आपल्याला होऊ नये. परमेश्वराचे नामस्मरण करताना मन चंचल होऊ नये. चांगला मार्ग आचरण्यासाठी बुद्धीला वळण लागो. स्वत:चे स्वत्व हृदयाला कळू दे. स्वत:ची ओळख, आत्मविश्वास वाढू दे. दुरभिमान, गर्विष्ठपणा गळून जाऊ दे. मन कधीही वाईट विचारांनी मलीन होऊ नये. आत्मज्ञानामध्ये सर्व अनिष्ट, दुरित भस्मसात होऊ दे.।। हे देवा, तुझे नाव माझ्या मुखातून सदैव येत राहो. माझे शरीररूपी घर तुझ्या नामोच्चाराने कुशल व पावन होवो. तुझ्या नामस्मरणाने माझ्या मनाच्या सर्व इच्छा तत्काळ पुरवल्या जातात. तिन्ही जगांत (स्वर्गलोक, इहलोक व पाताळ) राहणाऱ्या भक्तांवर तू कृपावंत होतोस, तशी तुझ्या आश्रयाला आलेल्या, शरण आलेल्या भक्तांवर तुझी कृपा प्रकट होऊ दे.।। भरतवाक्य कवितेची मध्यवर्ती कल्पना भरतवाक्य शब्दार्थ |


