Latest Maharashtra State Board (SSC & HSC) 2026-27 Syllabus Digest & Solutions Updated!
Class 7Marathi (Aksharbharati / Sulabhbharati)2026-27 Syllabus

Chapter 7.1 आजारी पडण्याचा प्रयोग Solutions

Complete Maharashtra State Board Balbharati & Yuvakbharati textbook solutions for Chapter 7.1 आजारी पडण्याचा प्रयोग. Step-by-step solved exercises, numerical problems, and digest answers.

39 Solved Questions10 Diagrams2191 words

Maharashtra State Board Class 7 Marathi Solutions Chapter 7.1 आजारी पडण्याचा प्रयोग

Marathi Sulabhbharti Class 7 Solutions Chapter 7.1 आजारी पडण्याचा प्रयोग Textbook Questions and Answers

1. केव्हा ते लिहा.

प्रश्न अ.
पाठातील मुलाला घरच्यांच्या दुःखात सहभागी व्हावे, असे वाटू लागले.
उत्तर:
आई, दादा, बाबा, ताई आजारी पडले की त्यांना औषध म्हणून संत्री, मोसंबी, सफरचंद, खडीसाखर, बेदाणा, पेढे, गोड औषध मिळायचे. अशक्तपणा आला की शिराही रोज मिळायचा हे सर्व पदार्थ आजारी म्हणून सगळेजण खात असत, पण मुलाला त्या पदार्थांना हात लावायची परवानगी नसायची तेव्हा मुलाला घरच्यांच्या दुःखात सहभागी व्हावे असे वाटू लागले.

प्रश्न आ.
मुलाने डॉक्टरांकडून औषध आणायचेच, असे ठरवले.
उत्तर:
घरातील मंडळी आजारी असून चांगले पदार्थ खात असत पण मुलाच्या वाटणीला काहीच आजारपण येत नसे. त्यांचा स्वार्थीपणा पाहिला तेव्हा मुलाच्या मनात विचार आला की, आपणही आजारी पडून डॉक्टरांकडून औषध आणायचेच.

प्रश्न इ.
मुलाला धन्य धन्य झाल्यासारखे वाटले.
उत्तर:
जेव्हा मुलाला डॉक्टरांनी तपासले; त्याला इकडे, तिकडे, पालथे वळायला सांगितले; गळ्यातली नळी छातीवर लावली; जीभ बघितली; तेव्हा मुलाला धन्य धन्य झाल्यासारखे वाटले.

प्रश्न ई.
डॉक्टरांचे बोलणे ऐकून मुलाची निराशा झाली.
उत्तर:
“तुला काही झालं नाही. समजलं ना? ठणठणीत आहे तब्येत तुझी, तेव्हा औषध काही नाही. पळ जा घरी.” असे डॉक्टर म्हणाल्यावर मुलाची निराशा झाली.

2. आकृत्या पूर्ण करा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
आकृत्या पूर्ण करा. (अ)
Solution & Step-by-Step Answer:

(आ)

उत्तर:

3. खालील तक्ता पूर्ण करा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
खालील तक्ता पूर्ण करा.
Solution & Step-by-Step Answer:

आपण आजारी असताना काय करू शकतो?

आपण आजारी नसताना काय करू शकत नाही?

1.  आपण आजारी असताना घरातल्या कामात मदत करू शकत नाही.

1. घरातल्या कामात मदत करू शकतो.

2. शाळेत जाऊ शकत नाही, अभ्यास करू शकत नाही.

2. शाळेत जाऊ शकतो, अभ्यास करू शकतो.

3. बाहेरचे पदार्थ खाऊ शकत नाही.

3. बाहेरचे पदार्थ (योग्य काळजी घेऊन) खाऊ शकतो.

4. तुमच्या घरातील एखादी व्यक्ती आजारी पडल्यास तिला मदत म्हणून तुम्ही काय कराल, ते लिहा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
तुमच्या घरातील एखादी व्यक्ती आजारी पडल्यास तिला मदत म्हणून तुम्ही काय कराल, ते लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
आमच्या घरातील एखादी व्यक्ती आजारी पडली तर आम्ही खालील प्रमाणे मदत करू:

चर्चा करा. सांगा.

पाठामध्ये दुखणेकरी हा शब्द आलेला आहे. दुखणेकरी म्हणजे सतत आजारी पडणारी व्यक्ती. खाली काही वाक्प्रचार व म्हणी दिलेले आहेत. शिक्षक व पालक यांच्याशी चर्चा करून त्यांचा अर्थ समजून घ्या. त्यांचा वाक्यांत उपयोग करा.

खेळूया शब्दांशी.

(अ) खालील शब्दांना मराठी भाषेतील पर्यायी शब्द लिहा.
(अ) डॉक्टर, (आ) ऑपरेशन, (इ) मेडिसीन, (ई) पेशंट

प्रश्न (अ).
खालील शब्दांना मराठी भाषेतील पर्यायी शब्द लिहा.
(अ) डॉक्टर
(आ) ऑपरेशन
(इ) मेडिसीन
(ई) पेशंट
उत्तर:
(अ) वैदय
(आ) शस्त्रक्रिया
(इ) औषधे
(ई) रुग्ण

(आ) ‘गुळगुळीत बिछाना’ त्याप्रमाणे खाली दिलेल्या चौकोनातील शब्दांच्या जोड्या जुळवा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
‘गुळगुळीत बिछाना’ त्याप्रमाणे खाली दिलेल्या चौकोनातील शब्दांच्या जोड्या जुळवा.
Solution & Step-by-Step Answer:

(इ) खाली दिलेल्या चौकोनातील चित्रासंबंधी काही शब्द दिलेले आहेत, त्या शब्दांचा उपयोग करून वाक्ये तयार करा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
खाली दिलेल्या चौकोनातील चित्रासंबंधी काही शब्द दिलेले आहेत, त्या शब्दांचा उपयोग करून वाक्ये तयार करा.
Solution & Step-by-Step Answer:

(ई) कंसात दिलेल्या वाक्प्रचारांच्या उपयोग करुन खालील वाक्ये पूर्ण करा.
(सुचेनासे होणे, सक्त मनाई असणे, फुशारकी मारणे, ठणठणीत असणे)
(अ) सुलेमान चाचा रोज सकाळी फिरायला जातात, त्यामुळे त्यांची तब्येत ……………………..
(आ) ध्वनीक्षेपकाच्या आवाजामुळे घरात आजोबांना काही ………………………..
(इ) जॉन आज शाळेत नवीन कंपास घेऊन आला होता. वर्गातील सर्व मुलांना दाखवत तो खूप …………………. होता.
(ई) तो रस्ता खासगी असल्यामुळे आपले वाहन तेथे नेण्याला ……………………..

उपक्रम :मराठी भाषेत विनोदी लेखन करणाऱ्या लेखकांची व त्यांच्या साहित्याची शिक्षक, पालक यांच्या मदतीने यादी करा. विनोदी गोष्टी वाचा व वर्गात सांगा.

सारे हसूया.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
कंसात दिलेल्या वाक्प्रचारांच्या उपयोग करुन खालील वाक्ये पूर्ण करा. (सुचेनासे होणे, सक्त मनाई असणे, फुशारकी मारणे, ठणठणीत असणे) उत्तरः (अ) सुलेमान चाचा रोज सकाळी फिरायला जातात, त्यामुळे त्यांची तब्येत ठणठणीत असते. (आ) ध्वनीक्षेपकाच्या आवाजामुळे घरात आजोबांना काही सूचेनासे झाले. (इ) जॉन आज शाळेत नवीन कंपास घेऊन आला होता. वर्गातील सर्व मुलांना दाखवत तो खूप फुशारकी मारत होता. (ई) तो रस्ता खासगी असल्यामुळे आपले वाहन तेथे नेण्याला सक्त मनाई आहे.

संदेश तयार करूया.

1. दवाखाना वा दवाखान्याच्या परिसरात अनेक पाट्या असतात. त्या वाचा. त्यावरील मजकूर खालील रिकाम्या पाटीवर लिहा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
दवाखाना वा दवाखान्याच्या परिसरात अनेक पाट्या असतात. त्या वाचा. त्यावरील मजकूर खालील रिकाम्या पाटीवर लिहा.
Solution & Step-by-Step Answer:

आपण समजून घेऊया

वरील अधोरेखित शब्द स्वतंत्र नाहीत. वर, बाहेर, पेक्षा हे शब्द अनुक्रमे टेबल, घरटे, विनया या शब्दांना जोडून आले आहेत, म्हणून ती शब्दयोगी अव्यये आहेत. आता, पूर्वी, नंतर, पर्यंत, आत, मागे, शिवाय हीदेखील शब्दयोगी अव्यये आहेत.

जेव्हा शब्दयोगी अव्यये नाम किंवा सर्वनाम यांना जोडून येतात, तेव्हा नामाच्या किंवा सर्वनामाच्या मूळ रूपात बदल होतो. अशा शब्दांना सामान्यरूप म्हणतात. उदा., शाळा-शाळेत, फाटक-फाटकात, रस्तारस्त्याला, मुले-मुलांना.
लक्षात ठेवा : शब्दयोगी अव्यय व क्रियाविशेषण अव्यय यांत फरक आहे.

खालील वाक्यांतील शब्दयोगी अव्यये अधोरेखित करा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
खालील वाक्यांतील शब्दयोगी अव्यये अधोरेखित करा.
Solution & Step-by-Step Answer:

Marathi Sulabhbharti Class 7 Solutions Chapter 7.1 आजारी पडण्याचा प्रयोग Important Additional Questions and Answers

खालील वाक्यात रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution

Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:

खालील वाक्ये कोण कोणास म्हणाले ते लिहा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
“डॉक्टर मला बरं वाटत नाही हो, मलाही औषध हवं आहे.”
Solution & Step-by-Step Answer:
मुलगा डॉक्टरांना म्हणाला.
प्रश्न 2 Maharashtra Board Solution
“तुम्हांला ऑपरेशन करता येतं का हो डॉक्टर?”
Solution & Step-by-Step Answer:
मुलगा डॉक्टरांना म्हणाला.
प्रश्न 3 Maharashtra Board Solution
“अहाहा! ……………, आपल्यालाही स्वतंत्र बाटली मिळायची तर एकूण!”
Solution & Step-by-Step Answer:
मुलगा स्वतःशीच म्हणाला,
प्रश्न 4 Maharashtra Board Solution
“डॉक्टर इंजेक्शन क्या बरं का”
Solution & Step-by-Step Answer:
मुलगा डॉक्टरांना म्हणाला.
प्रश्न 5 Maharashtra Board Solution
“समजलं ना? ठणठणीत आहे तब्येत तुझी.”
Solution & Step-by-Step Answer:
डॉक्टर मुलाला म्हणाले.
प्रश्न 6 Maharashtra Board Solution
“असं काय हो? क्या ना मला एखादं औषध”
Solution & Step-by-Step Answer:
मुलगा डॉक्टरांना म्हणाला,

खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
मुलाला कशाची लाज वाटली? उत्तरः आपण एकदाही कधी दुखणेकरी नव्हतो, ही गोष्ट लक्षात आल्यावर मुलाला त्याची लाज वाटली.

प्रश्न 2 Maharashtra Board Solution
घरातील सर्वजण आजारी पडल्यावर कोणती छान औषधे असायची?
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
घरातील सर्वजण आजारी पडल्यावर, संत्री, मोसंबी. सफरचंद,खडीसाखर, बेदाणा, पेढे ही गोड औषधे असायची.
प्रश्न 3 Maharashtra Board Solution
चार दिवस आजारी पडून अशक्तपणा आला म्हणजे कोणता पदार्थ व्हायचा?
Solution & Step-by-Step Answer:
चार दिवस आजारी पडून अशक्तपणा आला म्हणजे शिरा रोज व्हायचा.
प्रश्न 4 Maharashtra Board Solution
मुलाने मनाशी काय ठरवून टाकले?
Solution & Step-by-Step Answer:
मुलाने मनाशी ठरवले की, आपण आजारी पडून डॉक्टरांकडून औषध आणायचेच.
प्रश्न 5 Maharashtra Board Solution
मुलाने डॉक्टरांना काय सांगितले?
Solution & Step-by-Step Answer:
मुलाने डॉक्टरांना सांगितले, “डॉक्टर इंजेक्शन या बरं का, ताईला आणि दादाला खूप झालीत आतापर्यंत आता मला पाहिजे. निदान एक तरी.”

खालील प्रश्नांची तीन ते चार वाक्यांत उत्तरे लिहा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
आपण एकदाही कधी आजारी पडलो नाही, ही गोष्ट मुलाच्या ध्यानात आल्यावर त्याच्या मनात कोणते विचार आले?
Solution & Step-by-Step Answer:
आपण एकदाही कधी आजारी पडलो नाही ही गोष्ट मुलाच्या ध्यानात आल्यावर त्याला त्याची लाज वाटली, त्याच्या मनात आले की आपण एखाददुसऱ्या वेळी तरी आजारी पडायला पाहिजे होते. टायफॉइड, क्षय, न्युमोनिया असली मोठमोठी गोड दुखणी नाही, तर थंडीताप, खोकला, पडसे, पोटदुखी, डोकेदुखी यातले काहीही आपल्या वाटणीला आले नाही. तसेच स्वत:ची औषधाची बाटली, एखादे इंजेक्शनही आपल्या वाटणीला आले नाही.
प्रश्न 2 Maharashtra Board Solution
आपण घरातील सर्वांबरोबर औषधे घ्यावीत व त्यांच्या दुःखात सहभागी व्हावे, असे मुलाच्या मनात का आले?
Solution & Step-by-Step Answer:
आई, बाबा, दादा, ताई नेहमी आजारी पडायचे त्या सगळ्यांची औषधे मोठी छान असायची. संत्री, मोसंबी, सफरचंद, खडीसाखर, बेदाणा, पेढे, गोड औषधे यांचा सारखा मारा चाललेला असायचा, चार दिवस आजारी पडून अशक्तपणा आला म्हणजे शिराही रोज व्हायचा. हे सगळे पदार्थ ही मंडळी औषध म्हणून खात, पण मुलाला या सर्व पदार्थांना हात लावण्याचीही परवानगी नसायची म्हणून ही औषधे आपणही घ्यावीत व त्यांच्या दुःखात सहभागी व्हावे, असे मुलाच्या मनात आले.
प्रश्न 3 Maharashtra Board Solution
मुलगा नेहमीप्रमाणे दवाखान्यात गेल्यावर तेथील लोकांचा त्याला हेवा’ का वाटला?
Solution & Step-by-Step Answer:
मुलगा नेहमीप्रमाणे रोजच्या तीन-चार बाटल्या घेऊन दवाखान्यात गेला तेव्हा, दवाखान्यात खूप गर्दी होती. खूप गर्दी असल्यामुळे त्याला बरे वाटले कारण दवाखान्यात त्यामुळे जास्त वेळ बसायला मिळे. तो खुर्चीवर बसून लोकांकडे टकामका बघू लागला. काही लोक कण्हत होते. कुणी इंजेक्शन घेऊन बसले होते. आपल्या दंडावरील डागाकडे मोठ्या फुशारकीने पाहत होते या सगळ्या गोष्टी त्याच्या वाटेला कधीच आल्या नव्हत्या. म्हणून त्या सर्वांकडे बघून मुलाला त्यांचा हेवा वाटला.

पुढील उतारा वाचून सूचनेनुसार कृती करा.

कृती 1 : आकलन कृती

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
आकृतिबंध पूर्ण करा.
Solution & Step-by-Step Answer:

प्रश्न 2 Maharashtra Board Solution
रिकाम्या जागा भरा.

Solution & Step-by-Step Answer:

कृती 2 : आकलन कृती

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
चौकट पूर्ण करा.

Solution & Step-by-Step Answer:

खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
कोणाला इंजेक्शन खूप झाली आहेत असं मुलाला वाटतं?
Solution & Step-by-Step Answer:
ताईला आणि दादाला खूप इंजेक्शन झाली आहेत असं मुलाला वाटतं.
प्रश्न 2 Maharashtra Board Solution
डॉक्टरांनी ऑपरेशन केलं असतं तर मुलाने काय केलं असतं?
Solution & Step-by-Step Answer:
डॉक्टरांनी ऑपरेशन केलं असतं तर मुलाने पळतपळत घरी जाऊन सगळ्यांना ऑपरेशन दाखवलं असतं.

कृती 3 : व्याकरण कृती

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
खालील शब्दांचे वचन बदला.

Solution & Step-by-Step Answer:

खालील वाक्यांतील विरामचिन्हे ओळखा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
डॉक्टर म्हणाले, “हो का?”
Solution & Step-by-Step Answer:
, – स्वल्पविराम, ” ” – दुहेरी अवतरण चिन्ह, ? – प्रश्नचिन्ह

कृती 4 : स्वमत

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
आजारी पडण्याचे फायदे व तोटे तुमच्या शब्दांत लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
आजारी पडल्यामुळे शाळेला सुट्टी मिळते. आजूबाजूची मंडळी आपल्याला भेटायला येतात. येताना फळ किंवा नारळपाणी आणतात. सगळे लाडाने जवळ घेऊन चौकशी करतात व काळजी घेतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुणीच काही काम सांगत नाही. पण फायदयांप्रमाणेच काही तोटेही होतात. ते म्हणजे आजारी असल्यामुळे जेवणाखाण्याची पथ्य पाळावी लागतात. खेळायला जाता येत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टरचे इंजेक्शन आणि गोळ्या खाव्या लागतात. मग त्या भितीने आजारीच पडू नये असे वाटू लागते.

व्याकरण व भाषाभ्यास

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.

Solution & Step-by-Step Answer:

प्रश्न 2 Maharashtra Board Solution
खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.

Solution & Step-by-Step Answer:
प्रश्न 3 Maharashtra Board Solution
खालील शब्दांचे वचन बदला.

Solution & Step-by-Step Answer:

प्रश्न 4 Maharashtra Board Solution
खालील शब्दांचे लिंग बदला.

Solution & Step-by-Step Answer:

खालील वाक्ये शुद्ध स्वरूपात लिहा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
अगदी खासगि आवाजात मि डॉक्टरांना वीचारले.
Solution & Step-by-Step Answer:
ः अगदी खासगी’ आवाजात मी डॉक्टरांना विचारले.
प्रश्न 2 Maharashtra Board Solution
त्या गुळगूळीत खाटेवर झोपताना अशी काही मझा वाटली म्हणता!
Solution & Step-by-Step Answer:
ः त्या गुळगुळीत खाटेवर झोपताना अशी काही मजा वाटली म्हणता!

लेखन विभाग

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
मराठी भाषेत विनोदी लेखन करणाऱ्या लेखकांची व त्यांच्या साहित्याची शिक्षक, पालक यांच्या मदतीने यादी करा. विनोदी गोष्टी वाचा व वर्गात सांगा.
Solution & Step-by-Step Answer:

विनोदी लेखन करणारे लेखक

लेखकांचे साहित्य

द. मा. मिरासदार
अरूण वि. देशपांडे
अनिल अभ्यंकर
शं. ना. नवरे
सुजित जोशीअरुण सावळेकर
विवेक गरुड
पु. ल. देशपांडे

जावईबापूंच्या गोष्टी
गजाभाऊ
आनंदाचं झाड
चोरावर मोर
म्या बी शंकर हाय.
सुरंगा म्हणतात मला
एक अधिक उणे
बटाट्याची चाळ

प्रश्न 2 Maharashtra Board Solution
पाठामध्ये दुखणेकरी हा शब्द आलेला आहे. दुखणेकरी म्हणजे सतत आजारी पडणारी व्यक्ती. खाली काही वाक्प्रचार व म्हणी दिलेले आहेत. शिक्षण व पालक यांच्याशी चर्चा करुन त्यांच्या अर्थ समजून घ्या, त्यांचा वाक्यात उपयोग करा.
Solution & Step-by-Step Answer:
ः 1. इतिश्री – सांगता, शेवट. महाभारताची कौरव पांडवांच्या युद्धानंतर इतिश्री झाली.

2. छत्तीसचा आकडा – शत्रुत्व, वैर असणे.
त्या दोन्ही गावांमध्ये गावच्या हद्दीवरून छत्तीसचा आकडा होता.

3. जमदग्नीचा अवतार – अतिशय रागीट स्वभाव.
भगवान शंकराने तांडव नृत्य करताना जमदग्नीचा अवतार घेतला होता.

4. चोरावर मोर – स्वार्थीपणा करणे.
दोन भावांच्या भांडणात तिसरा भाऊ चोरावर मोर होऊन सर्व संपत्तीचा हक्कदार झाला.

5. लंकेची पार्वती – खूप गरिबी येणे.
साक्षीच्या अंगावर कर्जाचा डोंगर उभा राहिल्यामुळे ती लंकेची पार्वती झाली.

6. कळीचा नारद – इकडच्या गोष्टी तिकडे सांगून भांडणे करणे.
आई व आजीच्या भांडणात तेजश्री कळीचा नारद बनून आपले काम साध्य करत असायची.

7. घागरगडचा सुभेदार – स्वत:ला शहाणा समजणे.
गावाच्या पंचायती समोर प्रभाकर घागरगडचा सुभेदार बनून वावरत असे.

8. उंटावरचा शहाणा – स्वत:बद्दल फाजील अभिमान असणे.
राम आपल्या वर्गात आपला रुबाब दाखवून शिक्षकांसमोर उंटावरच शहाणा बनून राहायचा.

9. गळ्यातला ताईत – खूप लाडके असणे.
नातवंडे आजी आजोबांच्या गळ्यातला ताईत असतात.

आजारी पडण्याचा प्रयोग Summary in Marathi

पाठ परिचय :

घरातील नेहमी कुणीतरी काही ना काही कारणांमुळे आजारी पडायचे; आपणही असे आजारी पडून आजारी माणसांचे पदार्थ खावे असे मुलाला वाटायचे म्हणून मुलगा डॉक्टरांकडे जातो. दवाखान्यातील आजारी माणसांचा मुलाला खूप हेवा वाटे. ‘तुला औषधाची गरज नाही’ हे डॉक्टरांचे बोलणे ऐकून शेवटी मुलाची निराशा होते. त्याचे आजारपणाबाबतचे असे विचार व दवाखान्यातील वागणे याचे मार्मिक व विनोदी वर्णन ‘आजारी पडण्याचा प्रयोग’ या आपल्या पाठात लेखक द. मा. मिरासदार यांनी केले आहे.

Someone or the other used to fall sick due to different reasons in the house described in this comic write up. The boy also wishes to fall sick and enjoy the food meant for sick people, so he goes to the doctor. He used to always envy sick people in the dispensary. Doctor tells him ‘You don’t need medicines’ and the boy is very disappointed. His thoughts about illness and his behaviour at dispensary have been narrated in the write up by writer D. M. Mirasdar in very comic and subtle language.

शब्दार्थ :

वाक्प्रचार :