Maharashtra State Board Class 7 Marathi Solutions Chapter 12 रोजनिशी
Marathi Sulabhbharti Class 7 Solutions Chapter 12 रोजनिशी Textbook Questions and Answers
1. खालील प्रश्नांची तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
शिवारामध्ये गेल्यावर मुलांनी कोणकोणती पिके व फळझाडे पाहिली?
Solution & Step-by-Step Answer:
ः सुगीचे दिवस पाहण्यासाठी मुले गावशिवारात गेली असता त्यांनी मोत्यासारखी ज्वारी असलेली कणसं, तुरीच्या शेंगा, भुईमुगाच्या शेंगा आणि कपाशीच्या बोंडातून डोकवणारा कापूस अशी पिके पाहिली. तसेच त्यांनी पेरू, सीताफळ, आवळा, चिंच, बोर ही फळांनी लदबदलेली फळझाडेही पाहिली.
|
प्रश्न 3
Maharashtra Board Solution
वैष्णवीचा वाढदिवस कशा प्रकारे साजरा झाला?
Solution & Step-by-Step Answer:
ः वैष्णवीच्या वाढदिवसादिवशी तिला नातेवाईकांनी, मित्रमैत्रिणींनी फोनवरून शुभेच्छा दिल्या. वाढदिवसानिमित्त वैष्णवी, तिचे आईवडिल आदिवासी समाज कल्याण विभागाच्या एका वसतिगृहात गेले. तेथे शिक्षणासाठी राहणाऱ्या आदिवासी दुर्गम भागांतल्या मुलामुलींना खाऊचे वाटप केले. आईवडिलांपासून दूर आलेल्या त्या मुलांना पाहून वैष्णवीला गहिवरून आले. त्यांच्याकडे पाहून तिला शिकण्याची नवी उमेदही मिळाली. अशा प्रकारे वैष्णवीचा वाढदिवस साजरा झाला.
|
2. का ते लिहा.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
वैष्णवीच्या रोजनिशीतील कोणते पान तुम्हांला सर्वांत जास्त आवडते.
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
वैष्णवीच्या रोजनिशीतील १६ नोव्हेबरचे पान मला सर्वांत जास्त आवडले. कारण आपल्या वाढदिवशी आदिवासी समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहाला भेट देऊन तेथे शिक्षणासाठी राहणाऱ्या मुलांना खाऊ वाटण्याची कल्पना मला फार आवडली. म्हणूनच शिकण्याची नवी उमेद देणारे रोजनिशीतील हे पान मला सर्वांत जास्त आवडले.
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
वैष्णवीला गहिवरून आले.
Solution & Step-by-Step Answer:
वैष्णवी आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी आदिवासी समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात गेली होती. तेथे शिक्षणासाठी राहणाऱ्या आदिवासी दुर्गम भागांतील मुलामुलींना वैष्णवीने खाऊ वाटला. परंतु आपल्या आईवडिलांपासून दूर रहात असलेल्या त्या मुलांना पाहून तिला भरून आले. आपल्या आईवडिलांपासून दूर राहण्याच्या कल्पनेने तिला गहिवरून आले.
विचार करा. संगा.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
रोजनिशी का लिहावी? रोजनिशी लिहिल्याने काय फायदा होईल असे तुम्हांला वाटते?
Solution & Step-by-Step Answer:
रोजनिशी लिहिल्याने माणसाला जीवनाकडे बघण्याची नवी दृष्टी मिळते. रात्री झोपण्यापूर्वी दिवसभरातील सर्व घडामोडींची नोंद आपण रोजनिशीमध्ये करत असतो. ही नोंद पुढील गोष्टी ठरविण्यास, निर्णय घेण्यास मदत करते. रोजनिशी म्हणजे आठवणींचा खजिना असतो म्हणूनच रोजनिशी प्रत्येकाने लिहिली पाहिजे.
खेळ खेळूया.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
खालील कंसात काही म्हणी दिलेल्या आहेत दिलेल्या वाक्यांशी संबंधित म्हण ओळखा व लिहा. (अती तेथे माती, आगीतून उठून फुफाट्यात पडणे, पळसाला पाने तीनच, नावडतीचे मीठ अळणी, थेंब थेंब तळे साचे, कामापुरता मामा, गर्वांचे घर खाली) (अ) फुशारकी मारणाऱ्याचा पराजय होतो. [ ] (आ) एखादयाकडून काम करून घेताना गोड बोलायचं आणि काम झालं की त्याला सोडून द्यायचं. [ ] (इ) सगळीकडे परिस्थिती समान असणे. [ ] (ई) थोडे थोडे करून फार मोठे काम करून दाखवणे. [ ] (उ) एका संकटातून बचावणे व दुसऱ्या संकटात सापडणे. [ ] (ऊ) कुठल्याही गोष्टीचा अतिरेक केल्यास संपूर्ण नाश होतो. [ ] (ए) न आवडणाऱ्या माणसाने कितीही चांगली गोष्ट केली तरी ती वाईट दिसते. [ ] उत्तरः (अ) गर्वांचे घर खाली (आ) कामापुरता मामा (इ) पळसाला पाने तीनच (ई) थेंब थेंब तळे साचे (उ) आगीतून उठून फुफाट्यात पडणे (ऊ) अती तेथे माती (ए) नावडतीचे मीठ अळणी. |
नेहमी लक्षात ठेवा.
आपण समजून घेऊया.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
खालील शब्द वाचा. |
पाऊल, गरीब, चूल, माणूस, जमीन, पाटील, कठीण, फूल, सामाईक, संगीत, शरीर. वरील शब्दांतील शेवटच्या दोन अक्षरांचे निरीक्षण करा. काय जाणवते? या शब्दांतील शेवटच्या अक्षराला काना, मात्रा, वेलांटी, उकार या चिन्हांपैकी कोणतेच चिन्ह नाही; म्हणजेच या शब्दांतील शेवटचे अक्षर अकारान्त आहे आणि शेवटून दुसऱ्या अक्षराला दिलेली वेलांटी किंवा उकार दीर्घ आहे.
लक्षात ठेवा:
मराठी शब्दांतील अकारान्तापूर्वीचे इकार व उकार दीर्घ लिहितात; परंतु तत्सम (संस्कृतमधून मराठीमध्ये जसेच्या तसे आलेले शब्द) शब्दांतील अकारान्तापूर्वीचे इकार व उकार संस्कृतमधील मूळ शब्दाप्रमाणे हस्व लिहितात. उदा., चतुर, मंदिर, गुण, कुसुम, प्रिय, अनिल, स्थानिक.
Class 7 Marathi Chapter 12 रोजनिशी Additional Important Questions and
रिकाम्या जागा भरा.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
|

