Class 12 (HSC Board)Marathi (Yuvakbharati)2026-27 Syllabus
Chapter 1 वेगवशता Solutions
Complete Maharashtra State Board Balbharati & Yuvakbharati textbook solutions for Chapter 1 वेगवशता. Step-by-step solved exercises, numerical problems, and digest answers.
25 Solved Questions• 17 Diagrams• 2544 words
Maharashtra State Board 12th Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 वेगवशता
12th Marathi Guide Chapter 1 वेगवशता Textbook Questions and Answers
कृती
1. अ. पाठाच्या आधारे खालील चौकटी पूर्ण करा.
प्रश्न 1Maharashtra Board Solution
अ पाठाच्या आधारे खालील चौकटी पूर्ण करा.
Solution & Step-by-Step Answer:
:
आ. कृती करा.
प्रश्न 1Maharashtra Board Solution
आ. कृती करा
Solution & Step-by-Step Answer:
:
इ. कारणे शोधा व लिहा.
प्रश्न 1Maharashtra Board Solution
अमेरिकेतील माणसांचे जीवन वेगवान असते, कारण ………………..
Solution & Step-by-Step Answer:
: अमेरिकेतील माणसांचे जीवन वेगवान असते; कारण वेगवेगळ्या ठिकाणांमधील अंतर खूपच असते आणि दरडोई वाहन उपलब्ध असते
प्रश्न 2Maharashtra Board Solution
लेखकांच्या मते, गरजेच्या वेळी वाहनांचा वापर करायला हवा; कारण ………………….
Solution & Step-by-Step Answer:
: लेखकांच्या मते, गरजेच्या वेळी वाहनांचा वापर करायला हवा; कारण रस्त्यावर अडचणी निर्माण होणार नाहीत.
2. अ. योग्य पर्याय निवडून उत्तर लिहा.
प्रश्न 1Maharashtra Board Solution
जीवन अर्थ पूर्ण होईल, जर …………………. अ. वाहन कामापुरतेच वापरले तर. आ. वाहन आवश्यक कामासाठी वापरले तर इ. वाहनाचा वेग आटोक्यात ठेवला तर. ई. वरील तिन्ही गोष्टींचा अवलंब केला तर.
Solution & Step-by-Step Answer:
: ई. वरील तिन्ही गोष्टींचा अवलंब केला तर.
प्रश्न 2Maharashtra Board Solution
निसर्गविरोधी वर्तन नसणे, म्हणजे…………….. अ. स्वत:ला वाहनाशी सतत जखडून ठेवणे. आ. वाहनाचा अतिवेग अंगीकारणे. इ. तातडीचा भाग म्हणून कधीतरी वाहन वापरणे. ई. गरज नसताना वाहन वापरणे.
Solution & Step-by-Step Answer:
: इ. तातडीचा भाग म्हणून कधीतरी वाहन वापरणे.
आ. वाहन वापरातील फरक स्पष्ट करा.
प्रश्न 1Maharashtra Board Solution
Solution & Step-by-Step Answer:
:
अमेरिका
भारत
घरोघर, दरडोई वाहन उपलब्ध असते.
अंतरे कमी आहेत.
रस्ते रुंद, सरळ, निर्विघ्न व एकमार्गी
माणसे खूप आहेत.
कामांची वेगवेगळी ठिकाणे किमान शंभर मैल अंतरावर असतात.
कामे फारशी नसतात.
दूरदूरची ठिकाणे गाठण्यासाठी वेगाचा आश्रय घ्यावा लागतो.
महानगरे रेल्वेने जोडलेली आहेत.
3. खालील वाक्यांचा अर्थ सोदाहरण स्पष्ट करा.
प्रश्न अ. यथाप्रमाण गती ही गरज आहे ; पण अप्रमाण, अवास्तव आणि अनावश्यक गती ही एक विकृती आहे. उत्तर : योग्य त्या प्रमाणात, आवश्यक त्या प्रमाणात वाहन वापरणे ही माणसाची गरज आहे. योग्य त्या प्रमाणात वाहन न वापरणे, अव्यवहार्य रितीने वापरणे आणि गरज नसताना वापरणे हे अनैसर्गिक आहे.
प्रश्न आ. आरंभी माणसे वाहनांवर स्वार होतात. मग वाहने माणसांवर स्वार होतात. उत्तर : सुरुवातीला लोक गाडी जपून चालवतात. थोड्या काळासाठीच जपून चालवतात. मात्र हळूहळू त्यांना गाडीची चटक लागते. मग ते गरज असतानाच नव्हे, तर केवळ मौजमजा करण्यासाठीसुद्धा गाडीचा वापर करतात. हळूहळू त्यांना गाडीशिवाय कुठे जाताही येत नाही. पूर्णपणे ते गाडीवरच अवलंबून राहतात. हे सिगारेटच्या व्यसनासारखेच आहे.
सुरुवातीला फक्त एकदाच, मग फक्त एकच. असे करता करता दिवसाला एक पाकीट कधी होते हे कळतच नाही. नंतर नंतर सिगारेट मिळाली नाही तर त्या व्यक्तीचे मनःस्वास्थ्यच नाहीसे होते. सिगारेटशिवाय ती राहू शकत नाही. ती व्यक्ती सिगारेटचा गुलाम होऊन जाते. तद्वतच माणसेही गाड्यांचे गुलाम होतात. त्यांच्या वापराबाबत माणसांना कोणतेही तारतम्य राहत नाही.
प्रश्न इ. उगाच भावविवश होऊन वेगवश होऊ नये. उत्तर : वाहन हे सोयीसाठी असते. ते साधन आहे. आपला वेळ व आपले श्रम वाहनामुळे वाचतात. आपली कामे भराभर होतात. वाहनाचे हे स्थान ओळखले पाहिजे. यापलीकडे आपल्या भावना गुंतवू नयेत. वाऱ्यासोबत त्याच्या वेगाने धावू लागलो तर काही क्षण आनंद मिळतो. उत्साह, उल्हास शरीरात सळसळतो. म्हणजे आपल्या भावना उचंबळून येतात. या भावनांवर आपण आरूढ झालो, तर आपला वाहनावर ताबा राहत नाही आणि अपघातांची शक्यता निर्माण होते.
आपल्या वाहनाला धडकेल का, आपल्याला जिथे वळायचे आहे तिथे वळता येईल का, त्या वेळी बाकीच्या वाहनांची स्थिती कशी असेल, त्यांच्यापैकी कोणीही स्वत:ची दिशा बदलण्याचा संभव आहे का इत्यादी अनेक बाबींचा विचार काही क्षणांत करावा लागतो. त्या अनुषंगाने सतत विचार करीत राहावे लागते. वाहन आणि वाहनाची गती यांखेरीज अन्य कोणतेही विचार मनात आणता येत नाहीत.
एकाच विचाराला जखडले गेल्यामुळे डोळ्यांवर, शरीरावर व मनावर विलक्षण ताण येतो. अपघाताची भीती मनात सावलीसारखी वावरत असते. तासन्तास तणावाखाली राहावे लागल्याने मनावर विपरीत परिणाम होतात. वाहनाचा वेग जास्त असल्यामुळे अगदी बारीकशा खड्ड्यानेसुद्धा वाहनाला हादरे बसतात. सांधे दुखतात. ते कमकुवत होतात. अशा प्रकारे वाढता वेग म्हणजे ताण, हे समीकरण तयार होते.
4. व्याकरण.
अ. समानार्थी शब्द लिहा.
प्रश्न अ. समानार्थी शब्द लिहा.
उत्तर :
आ. खालील सामासिक शब्दांचा विग्रह करून समास ओळखा.
प्रश्न आ. खालील सामासिक शब्दांचा विग्रह करून समास ओळखा.
उत्तर :
इ. कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा.
प्रश्न इ. कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा.
उत्तर :
5. स्वमत.
प्रश्न अ. ‘वाहनांच्या अतिवापराने शरीर व्यापारात अडथळे निर्माण होतात’, तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा. उत्तर : अलीकडच्या काळात जीवन विलक्षण गतिमान झाले आहे. एकाच माणसाला अनेक कामे पार पाडावी लागतात. तीसुद्धा कमी अवधीत. कामांशी संबंधित ठिकाणी अनेक माणसांना अनेक ठिकाणी गाठावे लागते. मोठमोठी अंतरे कापावी लागतात. चालत जाऊन ही कामे करता येणे शक्य नसते. साहजिकच वाहनांचा उपयोग अपरिहार्य ठरतो.
फक्त एका-दोघांना किंवा फक्त काहीजणांनाच वाहन वापरावे लागते असे नाही. सामान्य माणसांनाही वाहन वापरणे गरजेचे होऊन बसले आहे. सतत वाहन वापरण्याचे दुष्परिणाम खूप होतात. आपण चालत चालत जाऊन कामे करतो, तेव्हा शरीराच्या सर्व प्रकारच्या हालचाली होतात. इकडे-तिकडे वळणे, खाली वाकणे, वर पाहणे, मागे पाहणे, हात वर-खाली करणे, पाय दुमडून बसणे.
पाय लांब करून बसणे, उकिडवे बसणे अशा कितीतरी लहान लहान कृतींतून शारीरिक हालचाली घडत असतात. या हालचालींमुळे शरीराच्या सगळ्याच स्नायूंना आणि सांध्यांना भरपूर व्यायाम मिळतो. शरीर लवचीक बनते. आपण या हालचाली सहजगत्या, एका लयीत करू शकतो. एक सुंदर, नैसर्गिक लय शरीराला लाभते. मात्र, सतत वाहनांचा उपयोग करावा लागल्यामुळे हालचालींना आपण मुकतो.
शरीराला लवचिकता प्राप्त होत नाही. शरीराच्या अनेक व्याधींना सुरुवात होते. दुःखे, कटकटी भोगाव्या लागतात. पैसा, वेळ खर्च होतो. दैनंदिन जीवन विस्कळीत होते. जगण्यातला आनंद नाहीसा होतो. म्हणजे आपल्या शरीर व्यापारात अनेक अडथळे निर्माण होतात.
प्रश्न आ. ‘वाढता वेग म्हणजे ताण’, याविषयी तुमचे मत सविस्तर लिहा. उत्तर : माणसे वाहनात बसली की ते दृश्य पाहण्यासारखे असते. सर्वजण उल्हसित मन:स्थितीत असतात. सगळ्यांच्या बोलण्याच्या कोलाहलामुळे वातावरणात आनंद भरून जातो. वाहनचालकाला हळूहळू सुरसुरी येते. तो हळूहळू वेग वाढवू लागतो. सर्वजण उत्तेजित होतात. गाडीचा वेग वाढतच जातो. मागे पडत जाणाऱ्या वाहनांकडे सगळेजण विजयी मुद्रेने पाहू लागतात.
चालक हळूहळू बेभान होतो. अन्य गाडीवाले सामान्य आहेत, कमकुवत आहेत, आपण सम्राट आहोत, अशी भावना मनातून उसळी घेऊ लागते. अशा मन:स्थितीत माणूस विवेक गमावतो. गाडी सुरक्षितपणे चालवण्यासाठी ही मन:स्थिती अनुकूल नसते. गाडी सुरक्षितपणे चालवण्यासाठी चित्त एकवटून वाहनावर केंद्रित करावे लागते. हात आणि पाय यांच्या हालचाली अचूक जुळवून घेण्यासाठी सतत मनाची तयारी ठेवावी लागते.
क्लच, ब्रेक, अक्सलरेटर, यांच्याकडे बारीक लक्ष ठेवावे लागते. त्याच वेळी पाठीमागून व बाजूने येणारी वाहने आणि आपण यांच्यात सुरक्षित अंतर ठेवण्याचा कसोशीने प्रयत्न करावा लागतो. अन्य एखादे वाहन मध्येच आडवे येईल का, आपल्या वाहनाला धडकेल का, आपल्याला जिथे वळायचे आहे तिथे वळता येईल का, त्या वेळी बाकीच्या वाहनांची स्थिती कशी असेल, त्यांच्यापैकी कोणीही स्वत:ची दिशा बदलण्याचा संभव आहे का इत्यादी अनेक बाबींचा विचार काही क्षणांत करावा लागतो.
त्या अनुषंगाने सतत विचार करीत राहावे लागते. वाहन आणि वाहनाची गती यांखेरीज अन्य कोणतेही विचार मनात आणता येत नाहीत. एकाच विचाराला जखडले गेल्यामुळे डोळ्यांवर, शरीरावर व मनावर विलक्षण ताण येतो. अपघाताची भीती मनात सावलीसारखी वावरत असते. तासन्तास तणावाखाली राहावे लागल्याने मनावर विपरीत परिणाम होतात. वाहनाचा वेग जास्त असल्यामुळे अगदी बारीकशा खड्ड्यानेसुद्धा वाहनाला हादरे बसतात. सांधे दुखतात. ते कमकुवत होतात. अशा प्रकारे वाढता वेग म्हणजे ताण, हे समीकरण तयार होते.
प्रश्न इ. ‘वाहन हे वेळ वाचवण्यासाठी असते. ते वेळ घालवण्यासाठी नसते’, हे विधान तुमच्या शब्दांत स्पष्ट करा. उत्तर : खरे तर प्राचीन काळापासून वाहन निर्माण करणे, हे माणसाचे स्वप्न होते. त्याच्या मनात खोलवर रुजलेले हे स्वप्न प्राचीन कथांमधून, देवदेवतांच्या कथांमधून सतत व्यक्त होत राहिले आहे. माणसाच्या मनातल्या या प्रबळ प्रेरणेतूनच वाहनाची निर्मिती झाली आहे. वेळ आणि श्रम वाचवणे हाच वाहनाच्या निर्मितीमागील हेतू आहे. अलीकडच्या काळात जीवनाचा वेग प्रचंड वाढला आहे. वेळ थोडा असतो. कामे भरपूर असतात. कामाची ठिकाणेसुद्धा दूर दूर असतात. अनेक ठिकाणी जावे लागते.
अनेक माणसांना भेटावे लागते. म्हणूनच वाहनांची निर्मिती झाली आहे. वाहनांमुळे माणसाची प्रचंड प्रगती झाली आहे. त्यामुळे वाहनाला माणसाच्या जीवनात फार मोठे स्थान मिळालेले आहे. अशी ही अत्यंत महत्त्वाची वस्तू आपल्याकडे असावी, असे सगळ्यांना वाटू लागते. माणसे धडपडून वाहने प्राप्त करतात. प्रतिष्ठा मिळवतात. पण वेळ व श्रम वाचवणे हा उद्देश मात्र त्यांच्या मनातून केव्हाच दूर होतो. वाहन हे साधन आहे.
ते आपला वेळ वाचवते यात शंकाच नाही. परंतु काहीही केले तरी किमान वेळ हा लागतोच. शून्य वेळामध्ये आपण कुठेही पोहोचू शकत नाही. वाहन ही अखेरीस एक वस्तू आहे. वस्तूला तिच्या मर्यादा असतात. हे लक्षात न घेता आपण जास्तीत जास्त वेग वाढवून कमीत कमी वेळात पोहोचण्याचा हव्यास बाळगतो. अतिवेगामुळे आपलेच नुकसान होते. अनेक शारीरिक व्याधी आपल्याला जडतात. शारीरिक क्षमता उणावते. जगण्यातला आनंद कमी होतो. हे सर्व आपण सतत लक्षात ठेवले पाहिजे.
पण हे कोणीही लक्षात घेत नाही. केवळ हौसेसाठी, गंमत-जंमत करण्यासाठी, आपल्याकडे गाडी आहे, ऐश्वर्य आहे हे दाखवण्यासाठी लोक गाडीचा उपयोग करतात. हळूहळू गाडीचे गुलाम बनतात. गाडी हे एक साधन आहे, हे आपण सतत लक्षात ठेवले पाहिजे.
प्रश्न ई. ‘वाहनाची अतिगती ही विकृती आहे’, स्पष्ट करा. उत्तर : वाहनाची अतिगती ही विकृती आहे, हे विधान शंभर टक्के सत्य आहे. हे विधान मला पूर्णपणे मान्य आहे. विकृती म्हणजे जे सहज नाही, नैसर्गिक नाही ते. कल्पना करा. आपल्याला चॉकलेट खूप आवडते. सर्व जगात असे किती जण आहेत, जे सकाळी, दुपारी, संध्याकाळी व रात्री आवडते म्हणून फक्त चॉकलेटच खातात? समजा एखादयाला पांढरा रंग खूप आवडतो, म्हणून तो घरातल्या सर्व माणसांना फक्त पांढऱ्या रंगाचेच कपडे घेतो. घराला पांढरा रंग देतो. अंथरुणे-पांघरुणे पांढरी, खिडक्यांचे पडदे पांढरे, भांडीकुंडी, फर्निचर पांढऱ्या रंगाचे. हे असे करणारा जगामध्ये.
एक तरी माणूस असेल का? सर्वजण पायांनी चालतात. उलटे होऊन हातांवर तोल सावरत प्रयत्नपूर्वक चालता येऊ शकते. पण अशा त-हेने नियमितपणे जाणारा एक तरी माणूस सापडेल का? जे सहज आहे, नैसर्गिक आहे तेच साधारणपणे माणूस करतो. तीच खरे तर प्रकृती असते. याच्या विरुद्ध वागणे म्हणजे विकृती होय. रोजच्या जेवणात वरण-भात आणि भाजी-पोळी असणे, घरात विविध रंगसंगती योजणे, पायांनी चालणे हे सर्व सहज, नैसर्गिक आहे.
सर्व माणसे तसेच वागतात. हाच न्याय वाहनांनासुद्धा लागू पडतो. मर्यादित वेगाने वाहन चालवत, अपघाताची शक्यता निर्माण होऊ न देता, सुरक्षितपणे, वेळेत पोहोचणे हा वाहनाने प्रवास करण्याचा हेतू असतो. हा हेतू आपण अतिवेगाचा हव्यास बाळगला नाही तरच यशस्वी होतो. म्हणून अतिवेग ही विकृती होय, हेच खरे.
6. अभिव्यक्ती.
प्रश्न अ. रस्त्यावरील वाहतूक कोंडीत सापडल्यावर तुमची भूमिका काय असेल ते लिहा. उत्तर : सध्या वाहनांची प्रचंड गर्दी झाली आहे. रस्ते मात्र पूर्वीएवढेच आहेत. रस्त्यांची संख्या पूर्वीइतकीच आणि त्यांची लांबी-रुंदीसुद्धा पूर्वीइतकीच. गाड्यांची संख्या मात्र प्रचंड वाढली आहे. कमी वेळात पोहोचण्याच्या इच्छेने वाहन खरेदी केले जाते खरे; पण वाहतूक कोंडीतच तासन्तास वाया जातात. या परिस्थितीमुळे मनाचा संताप होतो. वाहन आपल्या मालकीचे असते. पण रस्ता.
आपल्या मालकीचा नसतो. मग वाहतूक कोंडीच्या ठिकाणी प्रचंड गदारोळ माजतो. प्रत्येकजण स्वत:ची गाडी वाटेल तशी पुढे दामटत राहतो. सर्व गाड्या एकमेकांच्या वाटा अडवून उभ्या राहतात. कोणीही पुढे जाऊ शकत नाही की मागे परतू शकत नाही. गाड्यांचे हॉर्न कर्कश आवाजात मोठमोठ्याने कोकलत असतात. काही जणांची भांडणे सुरू होतात. पोलीस हतबल होतात.
अशा प्रसंगात मी सापडलो तर? सर्वप्रथम हे लक्षात घेईन की परिस्थिती माझ्या नियंत्रणात नाही. मी पूर्णपणे शांत राहीन. मनाची चिडचिड होऊ देणार नाही. अस्वस्थ होणार नाही. हॉर्न तर मुळीच वाजवणार नाही. मध्ये मध्ये घुसून पुढे जाण्याचा प्रयत्न करणार नाही. तसे करणाऱ्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करीन. कारण अशा पद्धतीने कोणीही पुढे जाऊ शकत नाही.
उलट अडचणींमध्ये भर पडण्याची शक्यता जास्त. आपण स्वतः पुढे होऊन रहदारीचे नियंत्रण करू लागलो तर लोक आपले ऐकणार नाहीत. पण आणखी एका दोघांशी बोलून दोघे-तिघे जण तिथल्या पोलीस काकांना भेटू. आमची मदत करण्याची इच्छा बोलून दाखवू. त्यांच्याशी चर्चा करून काय काय करायचे ते ठरवून घेऊ. कामांची आपापसांत वाटणी करून घेऊ आणि पोलीस काकांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक नियंत्रण सुरू करू.
प्रश्न आ. वाहन चालवत असताना कोणती काळजी घ्यावी, ते तुमच्या शब्दांत लिहा. उत्तर : गाडी चालवताना काळजी घेतली आणि वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळले तर प्रवास सुखाचा, सुरक्षित आणि कमीत कमी वेळेत पूर्ण होतो.
गाडी चालवायला बसण्यापूर्वीची पूर्वतयारी :
प्रत्यक्ष गाडी चालवताना घ्यायची काळजी :
अशा प्रकारे काळजी घेतल्यास आपला प्रवास सुखाचा होतो.
उपक्रम :
‘वाहतूक नियंत्रण पोलीस कर्मचारी’ यांची अभिरूप मुलाखत तुमच्या वर्गमित्राच्या/मैत्रिणीच्या मदतीने वर्गात सादर करा.
तोंडी परीक्षा :
‘वाहतूक सुरक्षेची गरज’ या विषयावर पाच मिनिटांचे भाषण दया.
Marathi Yuvakbharati 12th Digest Chapter 1 वेगवशता Additional Important Questions and Answers
प्रश्न. पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनांनुसार कृती करा :
कृती 1 : (आकलन)
योग्य पर्याय निवडून उत्तर लिहा.
प्रश्न 1Maharashtra Board Solution
1. वाहनाचा वेग अनिवार झाला, तर ……. 2. शरीर-मनावरील ताण नाहीसे होतात. 3. शरीरभर आनंदाची स्पंदने निर्माण होतात. 4. आरोग्याची हानी होते. 5. एकाच जागी तासन्तास जखडून बसण्याचे शारीरिक कौशल्य अवगत होते.
Solution & Step-by-Step Answer:
: 4. आरोग्याची हानी होते.
पुढील वाक्यांचा अर्थ सोदाहरण स्पष्ट करा :
प्रश्न 1Maharashtra Board Solution
जीवन हे दशदिशांना विभागले आहे.
Solution & Step-by-Step Answer:
: आधुनिक काळात खूप प्रगती झाल्यामुळे माणसे पूर्वीच्या काळापेक्षा कमी वेळात जास्त कामे करतात. त्यामुळे कामांची ठिकाणे अनेक असतात. ही ठिकाणे दूर दूर पसरलेली असतात.
प्रश्न 2Maharashtra Board Solution
अंतरावरच्या गोष्टींशी जवळीक साधण्यासाठी दूरवर जावे लागते.
Solution & Step-by-Step Answer:
: अमेरिकेसारख्या देशामध्ये राहण्याची ठिकाणे, नोकरीव्यवसायाची ठिकाणे, अन्य कामाची ठिकाणे ही सर्व दूर दूर अंतरावर असतात. ही अंतरे पार करण्यासाठी खूप प्रवास करावा लागतो. भारतातील अनेक व्यक्तींची मुले अमेरिकेसारख्या दूरदूरच्या देशांमध्ये राहतात. ही सर्व माणसे एकमेकांना नियमितपणे व सहजपणे भेटू शकत नाहीत. साहजिकच अंतरामुळे त्यांच्यात दुरावा निर्माण होतो.
शकत नाही. गाड्यांचे हॉर्न कर्कश आवाजात मोठमोठ्याने कोकलत असतात. काही जणांची भांडणे सुरू होतात. पोलीस हतबल होतात. अशा प्रसंगात मी सापडलो तर? सर्वप्रथम हे लक्षात घेईन की परिस्थिती माझ्या नियंत्रणात नाही. मी पूर्णपणे शांत राहीन. मनाची चिडचिड होऊ देणार नाही. अस्वस्थ होणार नाही. हॉर्न तर मुळीच वाजवणार नाही.
मध्ये मध्ये घुसून पुढे जाण्याचा प्रयत्न करणार नाही. तसे करणाऱ्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करीन. कारण अशा पद्धतीने कोणीही पुढे जाऊ शकत नाही. उलट अडचणींमध्ये भर पडण्याची शक्यता जास्त. आपण स्वतः पुढे होऊन रहदारीचे नियंत्रण करू लागलो तर लोक आपले ऐकणार नाहीत. पण आणखी एका दोघांशी बोलून दोघे-तिघे जण तिथल्या पोलीस काकांना भेटू. आमची मदत करण्याची इच्छा बोलून दाखवू. त्यांच्याशी चर्चा करून काय काय करायचे ते ठरवून घेऊ. कामांची आपापसांत वाटणी करून घेऊ आणि पोलीस काकांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक नियंत्रण सुरू करू.
प्रश्न 3Maharashtra Board Solution
रस्त्याने कोणी चालण्याऐवजी पळू लागला तर त्याचे कौतुक करावे का?
Solution & Step-by-Step Answer:
: रस्त्याने कोणीही चालण्याऐवजी पळू लागला, तर कोणीही कौतुक करणार नाही. रस्ते, वाटा या चालण्यासाठी असतात. माणसे सर्वसाधारणपणे जशा कृती करतात, जशी वागतात, तशी वागली तर लोकांना बरे वाटते. वेगळी वागली, तर काहीतरी विचित्र घडत आहे, असे वाटू लागते.
लिहा :
प्रश्न 1Maharashtra Board Solution
Solution & Step-by-Step Answer:
:
कृती करा :
प्रश्न 1Maharashtra Board Solution
Solution & Step-by-Step Answer:
:
प्रश्न 2Maharashtra Board Solution
Solution & Step-by-Step Answer:
:
प्रश्न 3Maharashtra Board Solution
Solution & Step-by-Step Answer:
:
रिकाम्या चौकटी भरा :
प्रश्न 1Maharashtra Board Solution
Solution & Step-by-Step Answer:
:
रिकाम्या जागा भरा :
प्रश्न 1Maharashtra Board Solution
वाई, सातारा अशा गावी वाहनाचा उपयोग होऊ शकतो, जर … i. …………………. ii. …………………
Solution & Step-by-Step Answer:
: वाई, सातारा अशा गावी वाहनाचा उपयोग होऊ शकतो, जर … i. तातडीने शेतमळ्यावर जाण्याची वेळ आली. ii. आपण गावाबाहेर राहत असू.
प्रश्न 2Maharashtra Board Solution
इतरांशी मानसिक स्पर्धा करण्यासाठी किंवा आपल्या ऐश्वर्याचे प्रदर्शन घडवण्यासाठी माणसे …..
Solution & Step-by-Step Answer:
: इतरांशी मानसिक स्पर्धा करण्यासाठी किंवा आपल्या ऐश्वर्याचे प्रदर्शन घडवण्यासाठी माणसे गरज नसताना कर्ज काढून वाहने खरेदी करतात.
सूचनेप्रमाणे उत्तरे लिहा :
प्रश्न 1Maharashtra Board Solution
वाहनाचा वेग बेताचा हवा, असे लेखक सांगतात त्यामागील कारण लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
: वाहनाचा वेग बेताचा हवा, असे लेखक सांगतात, त्यामागील कारण अतिघाई किंवा अतिवेग यांत कोणतेही औचित्य नसते.
प्रश्न 2Maharashtra Board Solution
अपघात होण्याची दोन कारणे लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
:
वाक्ये पूर्ण करा :
प्रश्न 1Maharashtra Board Solution
Solution & Step-by-Step Answer:
:
व्याकरण :
वाक्यप्रकार:
वाक्यांच्या आशयावरून वाक्यप्रकार ओळखा :
प्रश्न 1Maharashtra Board Solution
Solution & Step-by-Step Answer:
:
प्रश्न 2Maharashtra Board Solution
क्रियापदाच्या रूपांवरून वाक्यप्रकार ओळखा :
Solution & Step-by-Step Answer:
:
प्रयोग ओळखा :
प्रश्न 1Maharashtra Board Solution
Solution & Step-by-Step Answer:
:
अलंकार :
पुढील अलंकार ओळखा :
प्रश्न 1Maharashtra Board Solution
आईसारखे दैवत आईच होय!
Solution & Step-by-Step Answer:
: अनन्वय अलंकार
शब्दार्थ :
वाक्प्रचार व त्याचा अर्थ :
यथासांग पार पाडणे – सर्व बाजू पूर्ण करून पार पाडणे.