Maharashtra State Board Class 10 Marathi Kumarbharti Chapter 16 आकाशी झेप घे रे (कविता)
Marathi Kumarbharti Std 10 Digest Chapter 16 आकाशी झेप घे रे Textbook Questions and Answers
(आ) पिंजरा सोडून झेप घेतल्याने …………………………………
(१) काया सुखलोलुप होते.
(२) पाखराला आनंद होतो.
(३) आपल्याला स्वसामर्थ्याची जाणीव होते.
(४) आकाशाची प्राप्ती होते.
उत्तर:
पिंजरा सोडून झेप घेतल्याने – आपल्याला स्व-सामर्थ्याची जाणीव होते.
(आ) ‘आकाशी झेप घे रे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा’, या ओळीतील मथितार्थ स्पष्ट करा.
‘आकाशी झेप घे रे’ या कवितेमध्ये कवी जगदीश खेबुडकर यांनी पारतंत्र्यात खितपत पडलेल्या पाखराला म्हणजेच माणसांच्या परावलंबी मनाला मोलाचा उपदेश केला आहे व स्वातंत्र्याचे मोल समजावून सांगितले आहे.
प्रस्तुत ओळीतील मथितार्थ असा की यामध्ये पाखराला आकाशात भरारी घेण्याचे आवाहन केले आहे. वैभव, सत्ता, संपत्ती हा लौकिकातील सोन्याचा पिंजरा आहे. त्यात अडकलेल्या जिवाची गती खुंटते. त्याच्या जीवनाची प्रगती होत नाही. सुखसोईमुळे कर्तृत्व थांबते, म्हणून हा सोन्याचा पिंजरा सोडून ध्येयाच्या मोकळ्या व उंच आकाशात तू झेप घे. अशा प्रकारची आत्मिक शिकवण या ओळींतून प्रत्ययाला येते.
(इ) ‘स्वसामर्थ्याची जाणीव’ हा उत्तम व्यक्तिमत्त्व विकासाचा पाया आहे. हे विधान स्पष्ट करा.
उत्तर:
जीवन जगत असताना माणसाला अनेक अडचणींना तोंड दयावे लागते. समस्यांचा सामना करता करता कधी माणूस हतबल होऊन जातो. मग तो देवावर हवाला ठेवू लागतो. नशिबाला दोष देतो. पण हे असे वागणे अगदी नकारात्मक आहे. परिस्थिती बदलण्याचा माणसाने निकराने प्रयत्न करायला हवा. ‘प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे।’ अशी समर्थ रामदासांची उक्ती आहे. त्याप्रमाणे आत्मबळ एकवटणे महत्त्वाचे ठरते. स्वत:च्या सामर्थ्यावर भरवसा ठेवता आला पाहिजे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्वत:च्या पोटाला चिमटा घेऊन गोरगरिबांच्या शिक्षणाची सोय केली. ‘रयत शिक्षण संस्था’ निर्माण केली. आज त्याचा महावृक्ष झाला आहे. यावरून असे स्पष्ट होते की ‘स्वसामर्थ्याची जाणीव’ हा उत्तम व्यक्तिमत्त्व विकासाचा पाया आहे.
(ई) ‘घर प्रसन्नतेने नटले’, याची प्रचिती देणारा तुमचा अनुभव लिहा.
उत्तर:
कवी जगदीश खेबुडकर यांनी ‘आकाशी झेप घे रे’ या कवितेमध्ये माणसाला उपदेश करताना घर प्रसन्नतेने नटायचे असेल तर श्रमदेवाची पूजा करावी लागेल व घामातून मोती फुलवावे लागतील हे समजावून सांगितले आहे. कोणतीही गोष्ट घरबसल्या मिळत नाही. ‘दे रे हरी। खाटल्यावरी।’ असा चमत्कार होणे शक्य नसते. घर प्रसन्नतेने कसे नटते याची प्रचिती देणारा माझा स्वत:चा अनुभव सांगतो – ‘मला माझ्या आईसाठी थंडीमध्ये स्वेटर विणायचे होते. मी अभ्यासाची व शाळेची वेळ सांभाळून फावल्या थोड्या वेळात दररोज एक तास काढून कष्टाने स्वेटर विणले. ते आईला देताना तिच्या डोळ्यांत जे आनंदाश्रू चमकले, तेच माझ्या कष्टाचे फळ होते. आईचा तो आनंद पाहून मला ‘घर प्रसन्नतेने नटल्याचा व घामातुन मोती फुलले’ या विधानाचा अर्थ कळला.
Marathi Kumarbharti Class 10 Textbook Solutions Chapter 16 आकाशी झेप घे रे Additional Important Questions and Answers
कृति
कृतिपत्रिकेतील प्रश्न २ (अ) साठी…
प्रश्न. पुढील कवितेच्या आधारे दिलेल्यासूचनांनुसार कृती करा:
कृती १: (आकलन)
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
(i) देवाने पंख दिल्यामुळे – ………………………….. (१) हृदयात व्यथा जळते. (२) जीव बिचारा होतो. (३) सोन्याचा पिंजरा मिळतो. (४) शक्तीने संचार करता येतो.
Solution & Step-by-Step Answer:
देवाने पंख दिल्यामुळे – शक्तीने संचार करता येतो.
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
पुढील क्रियापदांपुढे कोठे, कोण, काय ते लिहा: (i) झेप घे – ………………………….. (ii) सोडून दे – ………………………….. (iii) जळते – ………………………….. (iv) अवतरले – ………………………….. (v) नटले – ………………………….. (vi) खायला मिळते – …………………………..
Solution & Step-by-Step Answer:
(i) झेप घे – आकाशात (ii) सोडून दे – सोन्याचा पिंजरा (iii) जळते – हृदयात व्यथा (iv) अवतरले – श्रमदेव घरात (v) नटले – प्रसन्नतेने घर (vi) खायला मिळते – रसाळ फळ.
प्रश्न 3
Maharashtra Board Solution
(i) एका किंवा दोन शब्दांत उत्तर लिहा: (सराव कृतिपत्रिका-३) (अ) पोपटाचे राहण्याचे ठिकाण – ………………………….. (आ) पोपटाचे खादय – …………………………..
Solution & Step-by-Step Answer:
(i) (अ) पोपटाचे राहण्याचे ठिकाण – पिंजरा (सोन्याचा) (आ) पोपटाचे खादय – फळे
(ii) पुढील शब्दसमूहाचा अर्थ स्पष्ट करा: (सराव कृतिपत्रिका-३) कृती २: (आकलन)
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
आकृतिबंध पूर्ण करा: (सराव कृतिपत्रिका-३)
Solution & Step-by-Step Answer:
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
पुढील गोष्टींचे परिणाम लिहा: (i) काया होते – ………………………….. (ii) कष्ट केल्यावर – ………………………….. (iii) जीवनात येतो – ………………………….. (iv) कळते पण – ………………………….. (v) बिचारा जीव होतो – …………………………..
Solution & Step-by-Step Answer:
(i) काया होते. – सुखलोलुप (ii) कष्ट केल्यावर – फळ मिळते (iii) जीवनात येतो – सुंदर योग (iv) कळते पण – वळत नाही (v) बिचारा जीव होतो – बावरा
कृती ३: (काव्यसौंदर्य)
प्रश्न 3
Maharashtra Board Solution
“सुखलोलुप झाली काया हा कुठवर वेड्या घेसी आसरा” या काव्यपंक्तीतील विचारसौंदर्य स्पष्ट करा. (सराव कृतिपत्रिका-३)
Solution & Step-by-Step Answer:
कवी जगदीश खेबुडकर यांनी ‘आकाशी झेप घे रे’ या कवितेमध्ये लौकिक गोष्टींमध्ये व नाशिवंत गोष्टींमध्ये रस घेणाऱ्या सुखलोलुप माणसांना मोलाचा उपदेश केला आहे. कवी म्हणतात-मोह माया, पैसा, संपत्ती यांच्या लोभात माणूस गुरफटला की त्याची फसगत होते. प्रगती खुंटते. तात्पुरते हे फळ रसाळ वाटते, पण ते सुख नाशिवंत आहे. हे सुख फार काळ टिकणारे नाही. या सुखाला शरीर चटावते म्हणून यातून जागृत हो. या लौकिक सुखाचा आश्रय घेऊ नको. हा सोन्याचा पिंजरा सोडून भरारी घे, अशा प्रकारे या ओळीतून कवींनी सुखाला लालचावलेल्या माणसांना मौलिक संदेश दिला आहे.
कृतिपत्रिकेतील प्रश्न २ (आ) साठी… प्रश्न. (५) कवितेतून व्यक्त होणारा (स्थायी) भाव: स्वसामर्थ्यावर विश्वास ठेवून स्वातंत्र्याचे मोल जाणत जगण्याची प्रेरणा देणारा भाव. (६) कवितेच्या कवींची लेखनवैशिष्ट्ये: ध्रुपद व कडवी अशी या गीताची सुटसुटीत रचना आहे. रसाळ शब्दकळा व नेमके मर्म सांगणारी भाषा हे या कवितेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. पिंजरा हे पारतंत्र्याचे प्रतीक, तर पंख हे मुक्तपणे आकाशात विहार करण्याचे प्रतीक, दऱ्या-डोंगर, सरिता-सागर ही सर्व अडचणींची प्रतीके. सर्वसामान्य लोकांना सहज कळतील, आशय थेट मनाला भिडेल, अशी ही सोपी, साधी प्रतीके कवींनी वापरली आहेत. ‘फळ रसाळ मिळते’ याप्रमाणे अनुप्रासांचा सुंदर उपयोग केलेला आहे. एकूण, ही कविता रसाळ, प्रासादिक बनली आहे. (७) कवितेची मध्यवर्ती कल्पना: स्वत:च्या क्षमतेवर, स्वत:च्या सामर्थ्यावर अढळ विश्वास ठेवावा आणि त्या बळावर यशाच्या दिशेने दमदार पावले टाकीत पुढे जावे. ध्येयाकडे आपण पोहोचणारच याची मनोमन खात्री बाळगावी. तात्कालिक मोहाच्या गोष्टींमध्ये गुंतून पडू नये. स्वत:च्या मनाला मुक्त, स्वतंत्र ठेवावे. सुखलोलुपतेमध्ये मनाला अडकू देऊ नये. स्वातंत्र्याचे महत्त्व ओळखले पाहिजे, अशी या कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे. (८) कवितेतून व्यक्त होणारा विचार: माणसे अनेकदा दैवाच्या आहारी जातात. नशिबावर भरवसा ठेवतात. नशिबात असेल, तेच मिळेल; अधिक काहीही मिळणे शक्य नाही, अशी त्यांची ठाम समजूत असते. कवी जगदीश खेबुडकर ही समजूत दूर करायला सांगतात. त्यांच्या मते, माणसाने स्वत:चे सामर्थ्य ओळखले पाहिजे आणि कठोर परिश्रमांना सिद्ध झाले पाहिजे. कठोर परिश्रम केले, तर यश नक्कीच मिळते. प्रयत्नवाद हाच खरा विचार आहे. (९) कवितेतील आवडलेली ओळ: (१०) कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे: ही कविता म्हणजे एक गाजलेले चित्रपट गीत आहे. त्याची चाल, संगीत चांगले आहे. गीत ऐकत राहावे असे वाटते. गीत दमदारपणे गायलेले आहे. ते लक्षातही राहते. मात्र एका ठिकाणी मन अडकते. अवतीभवती मोहाचा पसारा आहे; मन त्यात सहजपणे अडकते. हे सांगताना कवी म्हणतात, “तुजभवती वैभव माया/फळ रसाळ मिळते खाया.” पुढे, कष्ट केल्याशिवाय, खस्ता खाल्ल्याशिवाय फळ मिळत नाही. हे सांगताना कवी म्हणतात, “कष्टाविण फळ ना मिळते,” असे म्हटले आहे. यात काहीसा विरोध जाणवतो. हे थोडेसे खटकते. (११) कवितेतून मिळणारा संदेश: माणसाने कष्टावर, प्रयत्नावर विश्वास ठेवला पाहिजे, ‘असेल हरी, तर देईल खाटल्यावरी’ असे मानू नये. नशिबाने काहीही मिळत नाही. प्रयत्नाने आपण आपले नशीब घडवत असतो. तसेच, केवळ देहाला तृप्त करणारी सुखे महत्त्वाची नसतात, ती तात्कालिक असतात. ती चिरकाल टिकत नाहीत. आपल्या प्रयत्नाने गगनात भरारी मारली पाहिजे. त्यातच खरे सुख असते; असा संदेश ही कविता देते. रसग्रहण प्रश्न. काव्यसौंदर्य: वरील ओळींमध्ये कवींनी श्रमाचे महत्त्व सांगितले आहे. कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही, अविरत प्रयत्न व काबाडकष्ट करून जेव्हा शेतकरी शेतामध्ये खपतो, तेव्हा त्याला मोत्यांसारखे पीक मिळते. त्याच्या घामातून मोती फुलतात. ते धनधान्य त्याच्या घरी येते, तेव्हा त्याच्या श्रमाचे सार्थक होते. जणू श्रमदेव त्याच्या घरी अवतरतात. भाषिक वैशिष्ट्ये: ध्रुपद व कडवी अशी या गीताची सुटसुटीत रचना आहे. रसाळ शब्दकळा व नेमके मर्म सांगणारी भाषा हे या कवितेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. ‘पिंजरा’ हे सुखलोलुपतेचे प्रतीक वापरले आहे व त्यात कैद झालेल्या मानवी मनाला ‘पक्षी’ म्हटले आहे. साध्या शब्दांत गहन आशय मांडला आहे. यमकप्रधान गेय रूपामुळे कविता मनात ठसते. व्याकरण व भाषाभ्यास कृतिपत्रिकेतील प्रश्न ४ (अ) आणि (आ) यांसाठी… कर्मधारय समास (i) कधी पहिले पद विशेषण असते.
(ii) कधी दूसरी पद विशेषण असते.
(iii) कधी दोन्ही पदे विशेषण असतात.
(iv) कधी पहिले पद उपमान असते. (v) कधी दुसरे पद उपमान असते. (vi) कधी दोन्ही पदे एकरूप असतात. १. समास:
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
पुढील वाक्ये वाचून त्यांतील सामासिक शब्द ओळखा व त्यांचा विग्रह करा: उदा., तलावातील नीलकमल किती शोभून दिसते आहे. नीलकमल → नील असे कमल (i) महाराष्ट्र राज्य समृद्ध आहे. (ii) या पुस्तकाचे भाषांतर चांगले झाले आहे. – (iii) आकाशात पांढराशुभ्र ढग तरंगत आहे.
Solution & Step-by-Step Answer:
(i) महाराष्ट्र → महान असे राष्ट्र (ii) भाषांतर → अन्य अशी भाषा (अंतर = अन्य) (iii) पांढराशुभ्र → शुभ्र असा पांढरा (पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. ६३)
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
पुढील सामासिक शब्दांचा विग्रह करा: (i) रक्तचंदन → …………………………. (ii) घनश्याम → …………………………. (iii) काव्यामृत → …………………………. (iv) पुरुषोत्तम → ………………………….
Solution & Step-by-Step Answer:
(i) रक्तचंदन → रक्तासारखे चंदन (ii) घनश्याम → घनासारखा श्यामल (ii) काव्यामृत → काव्य हेच अमृत (iv) पुरुषोत्तम → उत्तम असा पुरुष (पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. ६३)
प्रश्न 3
Maharashtra Board Solution
पुढील वाक्ये वाचून त्यातील सामासिक शब्द ओळखा व विग्रह करा: उदा., नेत्रांच्या पंचारतीनी सैनिकांना ओवाळले. पंचारती → पाच आरत्यांचा समूह. (i) असा माणूस त्रिभुवन शोधले तरी सापडायचा नाही. (ii) नवरात्रात ठिकठिकाणी गरबा नृत्य चालते. (iii) शाळेत आता हिंदी सप्ताह चालू आहे.
Solution & Step-by-Step Answer:
(i) त्रिभुवन → तीन भुवनांचा समूह. (ii) नवरात्र → नऊ रात्रींचा समूह. (iii) सप्ताह → सात दिवसांचा समूह (आह = दिवस). (पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. ६३)
प्रश्न 4
Maharashtra Board Solution
पुढील सामासिक शब्दांचा विग्रह करा: (i) अष्टाध्यायी → …………………………. (ii) पंचपाळे → …………………………. (iii) द्विदल → …………………………. (iv) बारभाई → …………………………. (v) त्रैलोक्य → ………………………….
Solution & Step-by-Step Answer:
(i) अष्टाध्यायी → आठ अध्यायांचा समूह. (ii) पंचपाळे → पाच पाळ्यांचा समूह. (iii) द्विदल → दोन दलांचा समूह. (दल = पान) (iv) बारभाई → बारा भाईंचा समूह. (v) त्रैलोक्य → तीन लोकांचा समूह.
२. अलंकार: कृती करा: शिवप्रभू म्हणजे साक्षात तळपती तलवार होय. ३. वृत्त: ‘मालिनी’ या वृत्ताची लक्षणे सांगून उदाहरण दया. ४. शब्दसिद्धी:
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
पुढील शब्दांना आळ’ हा प्रत्यय लावून शब्द तयार करा: (i) रस – …………………………. (ii) मध – ………………………….
Solution & Step-by-Step Answer:
(i) रस – रसाळ (ii) मध – मधाळ.
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
‘प्रति’ हा उपसर्ग असलेले चार शब्द लिहा: (i) ………………………………. (ii) ………………………………. (ii) ………………………………. (iv) ……………………………….
Solution & Step-by-Step Answer:
(i) प्रतिबिंब (ii) प्रतिदिन (iii) प्रतिध्वनी (iv) प्रतिकूल.
५. सामान्यरूप: तक्ता पूर्ण करा: ६. वाक्प्रचार: (ii) विहार करणे – आ (भाषिक घटकांवर आधारित कृती: (२) पुढील शब्दांच्या अक्षरांपासून चार अर्थपूर्ण शब्द बनवा: (३) गटात न बसणारा शब्द लिहा: (४) पुढील शब्दांचे भिन्न अर्थ लिहा: २. लेखननियम: ३. विरामचिन्हे: ४. पारिभाषिक शब्द: (i) Category – …………………………………… (ii) Documentary – …………………………………… (iii) Honourable – …………………………………… (मार्च ‘१९) (iv) Verbal – …………………………………… ५. अकारविल्हे / भाषिक खेळ:
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
पुढील शब्द अकारविल्हेनुसार लिहा: पिंजरा → पक्षी → जायबंदी → सुटका.
Solution & Step-by-Step Answer:
जायबंदी → पक्षी → पिंजरा → सुटका.
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
कृती करा:
Solution & Step-by-Step Answer:
आकाशी झेप घे रे Summary in Marathi आकाशी झेप घे रे कवितेचा भावार्थ लौकिक विनाशी गोष्टीत गुंतलेल्या मनाला मोलाचा उपदेश करताना कवी म्हणतात – हे पाखरा (हे माणसाच्या चंचल मना), तू ध्येयपूर्तीसाठी आकाशात उंच भरारी मार, सत्ता, संपत्ती याने वेढलेल्या सोन्याच्या या पिंजऱ्याचा मोह तू सोडून दे. हा सोन्याचा पिंजरा तुझ्या इच्छांच्या सफलतेला घातक आहे. या पिंजऱ्याचा त्याग करून तू यशाच्या शिखराकडे झेप घे. पारतंत्र्याचा त्याग करून स्वातंत्र्याचा आनंद घे. आता तू मोहमाया, पैसा, संपत्ती यांच्या गराड्यात घेरलेला आहेस. तुला सुखाचे फळ खायला मिळते आहे. तुझे शरीर या लौकिक सुखाला लालचावलेले आहे. या सुखात तू लोळतो आहेस. पण हे सुख किती काळ टिकेल? या सुखाचा आश्रय लवकरच संपेल. हे वेड्या मना, तू जागृत हो आणि लौकिक तात्पुरत्या सुखाचा त्याग कर. हे पाखरा (मनपाखरा), ईश्वराने तुला उडण्यासाठी पंख दिले आहेत. पंखांतील बळाने तू आकाशात मुक्तपणे संचार कर. जमिनीलगत असणारे डोंगर–दऱ्या, हिरवी राने, नया व समुद्र सारे (अडथळे) ओलांडून दिशांच्या पार जा. कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही. आयते कोणतेही सुख मिळत नाही. त्यासाठी अपार मेहनत करावी लागते; हे तुला समजते पण कृतीमध्ये, आचरणात, वागणुकीत येत नाही. त्यामुळे तुझे मनातले दुःख मनातल्या मनात जळत राहते, धुमसत राहते, स्वातंत्र्याची ओढ तर आहे; पण त्याची पूर्तता होत नाही. त्यामुळे तुझा बिचारा जीव कावराबावरा होतो, कासावीस होतो. घाम गाळला की शेतात मोती पिकतात. पिके बहरतात. हा श्रमरुपी ईश्वराचा चमत्कार आहे. कष्ट करून घरात येणारे धान्य म्हणजेच श्रमदेवाचे घरात होणारे आगमन होय, त्या वेळी घरात समृद्धी व प्रसन्नता होते. कष्ट केल्याने असा सुखाचा गोड, सुंदर प्रसंग आयुष्यात येतो, हे जाणून घे व स्वातंत्र्याचे मोल जाण. आकाशी झेप घे रे शब्दार्थ आकाशी झेप घे रे वाक्प्रचार व त्यांचे अर्थ आकाशी झेप घे रे म्हण व तिचा अर्थ कळते पण वळत नाही – एखादी गोष्ट किंवा तत्त्व समजते, परंतु त्याप्रमाणे आचरण होत नाही, कृती होत नाही. |






