Maharashtra State Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 14 बीज पेरले गेले
Marathi Aksharbharati Std 10 Digest Chapter 14 बीज पेरले गेले Textbook Questions and Answers
(अ) लेखकाच्या आई-वडिलांनी मन घट्ट करून मुलांचा निरोप घेतला, कारण ………………………….
लेखकाच्या आई-वडिलांनी मन घट्ट करून मुलांचा निरोप घेतला कारण आपल्या मुलांनी चांगले शिकावे, मोठा ऑफिसर व्हावे व घराण्याचे नाव उज्ज्वल करावे, या उद्देशाने मन घट्ट करून लेखकाच्या आई -वडिलांनी मुलांचा निरोप घेतला.
(आ) लेखकाला लहानपणी अनेक खेळाडू पाहण्याची संधी मिळाली. कारण ………………………….
उत्तरः
लेखकाला लहानपणी अनेक खेळाडू पाहण्याची संधी मिळाली कारण लेखकांचे चुलते वाय.एम.सी.ए. च्या कंपाऊंडमध्ये राहत असत. लेखकही शिक्षणासाठी काकांकडे राहत होते. त्या कम्पाऊंडमध्ये अनेक सभासद खेळण्यासाठी येत असत.
(इ) ‘आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन’ असे लेखकास वाटले, कारण ………………………….
उत्तरः
‘आंधळा मागतो एक डोळा व देव देतो दोन’ असे लेखकाला वाटले कारण लेखकाला क्रिकेट खेळ आवडू लागला होता. त्यांच्या कम्पाऊंडमध्ये सभासद खेळण्यासाठी येत त्यावेळी लेखकालाही चेंडू फेकण्यासाठी बोलावले जाई आणि लेखकाला हा खेळ आवडत असल्यामुळे तेही या कामासाठी तयार असत.
(ई) दुसऱ्या मुलांच्या हातांत खेळणी पाहून लेखकाला लहानपणी त्यांचा हेवा वाटत असे, कारण ………………………….
उत्तरः
दुसऱ्या मुलांच्या हातात खेळणी पाहून लेखकाला लहानपणी त्यांचा हेवा वाटत असे कारण तुटपुंज्या पगारात लेखकाचे वडील घरखर्च भागवत होते. त्यामुळे लेखकासाठी खेळणी विकत घेऊ शकत नव्हते.
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
आकृती पूर्ण करा.
Solution & Step-by-Step Answer:
ः
प्रश्न 3
Maharashtra Board Solution
ओघतक्ता तयार करा. उत्तरः |


प्रश्न 4
Maharashtra Board Solution
खालील शब्दांसाठी पाठात आलेले समानार्थी शब्द शोधून लिहा. (i) सही (ii) निवास (iii) क्रीडा (iv) प्रशंसा
Solution & Step-by-Step Answer:
ः (i) सही – स्वाक्षरी (ii) निवास – घर (iii) क्रीडा – खेळ (iv) प्रशंसा – स्तुती
|
प्रश्न 5
Maharashtra Board Solution
खालील वाक्यांत कंसातील वाक्प्रचारांचा योग्य उपयोग करून वाक्ये पन्हा लिहा. (आनंद गगनात न मावणे, हेवा वाटणे, खूणगाठ बांधणे, नाव उज्ज्वल करणे) |
(अ) मोठे झाल्यावर रुग्णांची सेवा करण्यासाठी मी नर्स होण्याचे मनाशी निश्चित केले.
मोठे झाल्यावर रुग्णांची सेवा करण्यासाठी मी नर्स होण्याची मनाशी खूणगाठ बांधली.
(आ) दारात अचानक मामा-मामींना बघून सर्वांना खूप आनंद झाला.
उत्तरः
अचानक दारात मामा-मामींना बघून सगळ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.
(इ) आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये कौस्तुभने बुद्धिबळ खेळात शाळेचे नाव उंचावले.
उत्तरः
आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये कौस्तुभने बुद्धिबळ खेळांत शाळेचे नाव उज्ज्वल केले.
(ई) मानसीने म्हटलेल्या गाण्याचे सर्वांनी केलेले कौतुक ऐकून मला क्षणभर तिचा मत्सर वाटला.








