Class 10 (SSC Board)Marathi (Aksharbharati / Sulabhbharati)2026-27 Syllabus
Chapter 12 रंग मजेचे रंग उदयाचे Solutions
Complete Maharashtra State Board Balbharati & Yuvakbharati textbook solutions for Chapter 12 रंग मजेचे रंग उदयाचे. Step-by-step solved exercises, numerical problems, and digest answers.
13 Solved Questions• 6 Diagrams• 2016 words
Maharashtra State Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 12 रंग मजेचे रंग उदयाचे
Marathi Aksharbharati Std 10 Digest Chapter 12 रंग मजेचे रंग उदयाचे Textbook Questions and Answers
प्रश्न 1Maharashtra Board Solution
(अ) कवितेच्या आधारे बी रुजण्याच्या क्रियेचा ओघतक्ता तयार करा. उत्तरः
(आ) आकृती पूर्ण करा.
उत्तरः
प्रश्न 2Maharashtra Board Solution
चौकटी पूर्ण करा. (i) जेथे दृष्टी पोहोचते असे ठिकाण – [ ] (ii) कवयित्रीच्या मते जपायची गोष्ट – [ ]
Solution & Step-by-Step Answer:
ः (i) जेथे दृष्टी पोहोचते असे ठिकाण – [फुलाफुलांचे ताटवे] (ii) कवयित्रीच्या मते जपायची गोष्ट – [सृषृ]
प्रश्न 3Maharashtra Board Solution
कवितेत आलेल्या खालील संकल्पना स्पष्ट करा. (i) आभाळाचे छत्र …………………………………… (ii) गर्भरेशमी सळसळ ……………………………………
काव्यसौंदर्य. (अ) खालील ओळींचे रसग्रहण करा. ‘हिरवी हिरवी मने भोवती, किती छटा हिरव्याच्या गर्भरेशमी सळसळण्याच्या जगात सांगू गोष्टी’
(आ) पृथ्वीला वाचवण्यासाठी काय काय करावे असे कवयित्रीला वाटते.
Solution & Step-by-Step Answer:
ः पृथ्वीवर मानवाने पर्यावरण संतुलन नष्ट करण्याचा सपाटा लावला आहे. झाडांची कत्तल, काँक्रीटीकरण, प्लॅस्टीकचा प्रचंड वापर, प्रदूषण इ. समस्यांनी पृथ्वी धोक्यात आली आहे. पर्यावरणाचे संतुलन नसल्याने पाऊसही नाही. पाण्याची समस्या भीषण आहे. अशा परिस्थितीत पृथ्वीचे संरक्षण करणे गरजेचे आहे. वनीकरण, झाडांची कत्तल रोखणे, प्लॅस्टीकला प्रतिबंध करणे, अशा उपायांनी अनेक समस्या रोखता येतील. वाढत्या जनसंख्येला आळा घालणे, गावागावांमध्ये वृक्षांची लागवड करणे, पाण्याचे साठे वाढविणे, विहिरी-तळी निर्माण करणे, इलेक्ट्रॉनिक कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे, ओला-सुका कचरा वेगवेगळा टाकणे, बायोगॅस वापरणे, सौरशक्तीचा वापर करणे, तंत्रज्ञानाचा मर्यादित योग्य वापर करणे अशा प्रकारे हरितक्रांती व औद्योगिक क्रांतीने पृथ्वीला वाचविता येईल. पृथ्वी ही माता आहे, या दृष्टीने तिचा आदर व सांभाळ सर्वांनीच करायला हवा.
(इ) वसुंधरेचे हिरवेपण जपण्यासाठी उपाय सुचवा. उत्तरः वसुंधरा ही हिरव्यागार शालूत शोभून दिसते. हिरवाईचा, शेतांचा, रानांचा व गवताच्या विविध हिरव्या छटा निसर्ग खुलवतो. वसुंधरेचे हिरवेपण जपण्यासाठी खालील उपाय करता येतील. (i) ‘झाडे लावा, झाडे जगवा’ या प्रतिज्ञेने सर्वांनीच ‘एक व्यक्ती, एक झाड’ असे प्रमाण ठेवले तर वसुंधरा हिरवीगार होईल. (ii) फळांच्या बिया मोकळ्या जागेत, डोंगरावर उधळाव्या. (iii) बागबगीचे, रानांकरिता अधिकृत जमीन राखावी व तेथे रोपे लावावी. (iv) जमिनीचा कस कमी व नष्ट करणाऱ्या वस्तू वापरू नये. उदा. प्लॅस्टीक, थर्मोकोल, अतिप्रमाणात वापरात असेलेली कीटकनाशके, (v) जागोजागी पाण्याचे साठे तयार करावेत, ज्यामुळे पावसाळ्याव्यतिरिक्तही झाडांना पाणी मिळेल. वसुंधरेच्या हिरवेपणावर आपले अस्तित्व टिकून आहे. याची जागृती प्रत्येक नागरिकाच्या मनात केली पाहिजे.
Marathi Akshar Bharati Class 10 Textbook Solutions Chapter 12 रंग मजेचे रंग उदयाचे Additional Important Questions and Answers
प्रश्न १.पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा,
कृती १ : आकलन कृती
प्रश्न 1Maharashtra Board Solution
आकृतिबंध पूर्ण करा.
प्रश्न 2. कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा, (i) फुलाफुलांचे दाट …………………………………… जिथे पोचते दृष्टी. (थवे, गुच्छ, ताटवे, झुडपे) (ii) …………………………………… देईना संगणक हा, काळी आई जगवू. (पैसे, दौलत, संपत्ती, धान्य) (iii) उधळू, फेकू बिया डोंगरी, रुजतील …………………………………… झाडे. (निलगिरी, आंब्याची, देशी, घनदाट) (iv) आभाळाच्या छत्राखाली, एक अनोखी …………………………………… (दृष्टी, तुष्टी, वृष्टी, पुष्टी)
कवी मातीमध्ये काम करणाऱ्या हातांना पुष्टी दयायला सांगतात.
(ii) यंत्राबरोबर राहिल्यास काय मिळेल? उत्तरः यंत्राबरोबर राहिल्यास पैसा, दौलत मिळेल.
कृती २ : आकलन कृती
प्रश्न 1Maharashtra Board Solution
चौकट पूर्ण करा. (i) जिथे दृष्टी पोचते तेथे असतात – [फुलांचे ताटवे] (ii) संगणक हे देत नाही – [धान्य] (iii) जगास या गोष्टी सांगू – [गर्भरेशमी सळसळण्याच्या]
(i) गच्च माजतील राने, होईल आभाळातून वृष्टी... (ii) फेनधवलशा तुषारांमध्ये, राहाल कैसे कष्टी? (iii) आभाळाच्या छत्राखाली, एक अनोखी तुष्टी... (iv) गर्भरेशमी सळसळण्याच्या जगास सांगू गोष्टी...
कृती ३: कवितेतील शब्दांचा अर्थ
प्रश्न 1Maharashtra Board Solution
खालील कवितेतील शब्दांचा अर्थ लिहा. (i) फूल (ii) दाट (iii) ताटवे (iv) दृष्टी
Solution & Step-by-Step Answer:
े: (i) कुसूम, सुमन (ii) गच्च (iii) बगिचे, उद्यान (iv) नजर
प्रश्न २. दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कवितेसंबंधी पुढील कृती सोडवा.
(१) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री: अंजली कुलकर्णी
(२) प्रस्तुत कवितेचा विषयः पर्यावरणाचे रक्षण केले तर मानवाला काही कमी पडणार नाही अशा भावनांचे वर्णन केले आहे.
(३) प्रस्तुत कवितेतील दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ: डोंगरातून वाहात येते, खळाळते हे पाणी फेनधवलशा तुषारांमध्ये, राहाल कैसे कष्टी?
आभाळातून होणाऱ्या पावसाच्या वृष्टीमुळे डोंगरातून खळाळत पाणी वाहत येईल. डोंगर दऱ्यातून वाहणारे धबधबे व त्यातून फेसाप्रमाणे उधळणाऱ्या पांढऱ्या तुषारांना पाहिल्यावर आपण आपली सारी दु:खे विसरून जाऊ व निसर्गाच्या सान्निध्यात खऱ्या अर्थाने आपण आनंदी होऊ, खळाळत्या पाण्याला पाहून आपल्याही मनात हास्याचे तुषार उधळले जातील व आपली सारी दुःखे राहणारच नाहीत, आपण कष्टी होणारी नाही? असे कवयित्री म्हणते.
(४) प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेशः
निसर्गाचे आणि मानवी जीवनाचे नाते हे अगदी घट्ट असेच आहे. निसर्गाच्या सहवासात माणूस अगदी आनंदी जगणे जगत असतो, पण आजच्या जागतिकीकरणाच्या या युगात संगणकामुळे आणि इतर वैज्ञानिक गोष्टींमुळे माणूस निसर्गापासून दूर होत चालला आहे. असे झाले तर माणसाला आपले अस्तित्व टिकवणे कठीण होऊन बसेल. पर्यावरणाची, निसर्गाची जोपसना केली तर मानवाला कधीच काही कमी पडणार नाही. निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेत घेत आपले जीवन आनंदमय करण्यासाठी निसर्गाच्या हातात हात घालून आपण पुढे वाटचाल केली पाहिजे, असा संदेश या कवितेतून आपल्याला मिळतो.
(५) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण :
‘रंग मजेचे रंग उदयाचे’ ही ‘अंजली कुलकर्णी’ यांची कविता मला खूप आवडली आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे कवयित्रीचे चित्रदर्शी वर्णन. त्यांच्या शब्दांमधून माणसाचा मातीशी, निसर्गाशी असलेला जिव्हाळ्याचा संबंध मनापासून जाणवतो. पर्यावरणाची काळजी घेणे हे आपले सर्वात महत्त्वाचे कर्तव्य आहे याची सोप्या व योग्य शब्दात कवयित्रीने करून दिलेली जाणीव खूप छान आहे. निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेत घेत आपले जीवन कसे आनंदी होऊन जाते, त्याचे वर्णन अप्रतिम आहे.
(६) प्रस्तुत कवितेतील खालील शब्दांचा अर्थः (i) जपणे – सांभाळणे (ii) सृष्टी – निसर्ग, जग (i) माती – मृदा (ii) पुष्टी – पाठबळ, पाठिंबा
स्वाध्याय कती
प्रश्न 1Maharashtra Board Solution
पृथ्वीला वाचवण्यासाठी काय करावे असे कवयित्रीला वाटते?
Solution & Step-by-Step Answer:
ः पृथ्वीवर मानवाने पर्यावरण संतुलन नष्ट करण्याचा सपाटा लावला आहे. झाडांची कत्तल, काँक्रीटीकरण, प्लॅस्टीकचा प्रचंड वापर, प्रदूषण इ. समस्यांनी पृथ्वी धोक्यात आली आहे. पर्यावरणाचे संतुलन नसल्याने पाऊसही नाही. पाण्याची समस्या भीषण आहे. अशा परिस्थितीत पृथ्वीचे संरक्षण करणे गरजेचे आहे. वनीकरण, झाडांची कत्तल रोखणे, प्लॅस्टीकला प्रतिबंध करणे, अशा उपायांनी अनेक समस्या रोखता येतील. वाढत्या जनसंख्येला आळा घालणे, गावागावांमध्ये वृक्षांची लागवड करणे, पाण्याचे साठे वाढविणे, विहिरी-तळी निर्माण करणे, इलेक्ट्रॉनिक कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे, ओला-सुका कचरा वेगवेगळा टाकणे, बायोगॅस वापरणे, सौरशक्तीचा वापर करणे, तंत्रज्ञानाचा मर्यादित योग्य वापर करणे अशा प्रकारे हरितक्रांती व औद्योगिक क्रांतीने पृथ्वीला वाचविता येईल. पृथ्वी ही माता आहे, या दृष्टीने तिचा आदर व सांभाळ सर्वांनीच करायला हवा.
प्रश्न 2Maharashtra Board Solution
वसुंधरेचे हिरवेपण जपण्यासाठी उपाय सुचवा.
Solution & Step-by-Step Answer:
ः वसुंधरा ही हिरव्यागार शालूत शोभून दिसते. हिरवाईचा, शेतांचा, रानांचा व गवताच्या विविध हिरव्या छटा निसर्ग खुलवतो. वसुंधरेचे हिरवेपण जपण्यासाठी खालील उपाय करता येतील. (i) ‘झाडे लावा, झाडे जगवा’ या प्रतिज्ञेने सर्वांनीच ‘एक व्यक्ती, एक झाड’ असे प्रमाण ठेवले तर वसुंधरा हिरवीगार होईल. (ii) फळांच्या बिया मोकळ्या जागेत, डोंगरावर उधळाव्या. (iii) बागबगीचे, रानांकरिता अधिकृत जमीन राखावी व तेथे रोपे लावावी. (iv) जमिनीचा कस कमी व नष्ट करणाऱ्या वस्तू वापरू नये. उदा. प्लॅस्टीक, थर्मोकोल, अतिप्रमाणात वापरात असेलेली कीटकनाशके, (v) जागोजागी पाण्याचे साठे तयार करावेत, ज्यामुळे पावसाळ्याव्यतिरिक्तही झाडांना पाणी मिळेल. वसुंधरेच्या हिरवेपणावर आपले अस्तित्व टिकून आहे. याची जागृती प्रत्येक नागरिकाच्या मनात केली पाहिजे.