Maharashtra State Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 रंग साहित्याचे
Marathi Aksharbharati Std 10 Digest Chapter 10 रंग साहित्याचे Textbook Questions and Answers









(आ) तुम्हाला आवडलेल्या कोणत्याही एका साहित्यप्रकाराची वैशिष्ट्ये तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तरः
मला आवडलेला साहित्यप्रकार म्हणजे कादंबरी. कादंबरी म्हणजे मोठी कथाच. विविध पात्रांनी, प्रसंगांनी नटलेली, सजलेली. कादंबरी जर खुमासदार असेल तर, ती हातातून सोडवत नाही. पुढे काय होणार याची उत्कंठा लागते. त्यातील पात्रांचा परिचय होतो व ती पात्रे आपल्याला आपल्यातीलच वाटू लागतात. कादंबरीत मन रममाण होते. सुखाच्या प्रसंगात भान हरपते. दु:खी प्रसंगाने अतिशय वाईटही वाटते, इतके तादात्म्य कादंबरीशी साधता येते. ‘ययाति’, ‘स्वामी’, या कादंबऱ्या माझ्या आवडत्या आहेत.
(इ) ‘उत्तम लेखक होण्यासाठी उत्तम वाचक होणे आवश्यक असते’, याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा.
उत्तरः
‘वाचाल तर वाचाल’ या उक्तीप्रमाणे वाचनाने आपणांस अनेक लाभ होतात. वाचनाने शब्द संपत्ती वाढते. नवनवीन संकल्पना कळतात. विचार प्रगल्भ होतात, लेखक होण्यासाठी या सर्वांचा उपयोग होतो. समाजातील चालीरिती, संस्कृती, नवीन शोध, पर्यटन, शैक्षणिक स्तर यांची माहिती वाचनाने मिळते. विचारांची बैठक पक्की होते. काळाचे भान येते. नव्या जुन्या गोष्टी कळतात. उत्तम विचार समर्थ लेखणीद्वारे प्रगट होतात.
(ई) तुम्हाला आवडलेल्या पुस्तकाबाबत खालील मुद्द्यांचा विचार करून माहिती लिहा.
(१) पुस्तकाचे नाव
(२) लेखक
(३) साहित्यप्रकार
(४) वर्ण्य विषय
(५) मध्यवर्ती कल्पना
(६) पुस्तकातून मिळणारा संदेश
(७) मूल्य
(८) सामाजिक महत्त्व
(९) आवडण्याची कारणे
उत्तरः
मला ‘पांडुरंग सदाशिव साने’ लिखित ‘श्यामची आई’ हे पुस्तक आवडते. हा ‘कादंबरी’ साहित्यप्रकार असून प्रस्तुत कादंबरीत श्याम हे मुख्य पात्र आहे. बालपणी त्यावर झालेले संस्कार, आईने लावलेले वळण, घरची गरीबी पण संस्कारांची श्रीमंती अशा मिश्रणातून घडलेला श्याम म्हणजे स्वतः लेखक पांडुरंग सदाशिव साने, अर्थात साने गुरूजी. मोठेपणी स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले.
गांधीवादाचा पुरस्कार केला. कारागृहात रोज रात्री आपल्या इतर कैदी मित्रांसोबत लहानपणीच्या सर्व आठवणींना उजाळा दिला. रोज एक कथा सांगण्याचा परिपाठ झाला व त्यातून ‘श्यामची आई’ पुस्तक साकारले. धारिष्ट्य, खरेपणा, स्वाभिमान, निखळप्रेम, सहिष्णूता या गोष्टींचा अंतर्भाव या कादंबरीत ओतप्रोत भरला आहे.
आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात बुद्ध्यांक जरी वाढला तरी भावनांक कमी झाला आहे. ही कादंबरी वाचून समानता, आदरभाव, स्वाभिमान, सच्चेपणा या मुल्यांची सजवणूक समाजात होईल, आईविषयीचे नितांत प्रेम, आईचे ही खरे मार्गदर्शन अशा वात्सल्यतेची अपूर्व कहाणी ‘श्यामची आई’ मध्ये असल्याने ही कादंबरी आवडते.
Marathi Akshar Bharati Class 10 Textbook Solutions Chapter 10 रंग साहित्याचे Additional Important Questions and Answers
प्रश्न १. खालील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. |
कृती १ : आकलन कृती
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
आकृतिबंध पूर्ण करा.
Solution & Step-by-Step Answer:
ः
|

प्रश्न 2
Maharashtra Board Solution
चौकटीत
Solution & Step-by-Step Answer:
े लिहा. उत्तरः (i) सुश्रुतची सहल या गावी नेण्याचे ठरले – [भिलार] (ii) मुलामुलींचा वेश करून आले – [पुस्तके] (ii) कथेचे दुसरे नाव – [गोष्ट]
|
प्रश्न 3
Maharashtra Board Solution
कोण कोणास म्हणाले?
Solution & Step-by-Step Answer:
ः
|

कृती २ : आकलन कृती
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
खालील शब्द
Solution & Step-by-Step Answer:
येईल असे प्रश्न तयार करा, (i) हातात हात घालून (ii) लहानपणापासूनच.
Solution & Step-by-Step Answer:
(i) काही पुस्तके कशी नाचत होती? (ii) कथेची ओळख सुश्रुतला केव्हापासून आहे?
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
सहसंबंध लिहा. (i) सूचना : वर्ग : : सहल : ……………………………..
Solution & Step-by-Step Answer:
भिलार
प्रश्न 3
Maharashtra Board Solution
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा, (i) सुश्रुतच्या वर्गाची …………………………….. गावाला सहल नेण्याचे ठरले. (किल्लारी, भिलार, पुणे, ठाणे) (ii) काही पुस्तके मुला – मुलींचा वेश करून आणि हातात हात घालून …………………………….. गाणी गात आहेत. (नाचत, बागडत, आनंदाने, उत्साहाने)
Solution & Step-by-Step Answer:
(i) भिलार (ii) आनंदाने
प्रश्न 4
Maharashtra Board Solution
खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.
|
(i) सुश्रुतला कथा आपले दुसरे नाव काय सांगते?
सुश्रुतला कथा आपले दुसरे नाव ‘गोष्ट’ असे सांगते.
(ii) सुश्रुतची आजी त्याला कोणत्या गोष्टी सांगायची?
उत्तर:
सुश्रुतची आजी त्याला कोल्हा, उंदीर, ससा-कासव यांच्या गोष्टी सांगायची.
(iii) अरे आम्ही सर्व तुला भेटायला आलो आहोत, असे सुश्रुतला कोण म्हणाले?
उत्तर:
अरे आम्ही सर्व तुला भेटायाला आलो आहोत, असे सुश्रुतला पुस्तकाच्या वेशातील मुले म्हणाली.
प्रश्न २. खालील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. कृती १ : आकलन कृती
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
आकृतिबंध पूर्ण करा. उत्तरः |



प्रश्न 2
Maharashtra Board Solution
खालील प्रश्नांची
Solution & Step-by-Step Answer:
े एका वाक्यात लिहा.
|
(i) कलाकृती उत्तम केव्हा होते?
उत्तरः
दर्जेदार कथा असली की कलाकृती उत्तम होते.
(ii) कथेच्या यशाचे रहस्य काय?
उत्तम निवेदनतंत्राचा वापर हे कथेच्या यशाचे रहस्य आहे.
(iii) कादंबरी वाचताना वाचक कशात रममाण होतो?
उत्तरः
कथानकात पुढे काय होईल याच्या विचारात कादंबरी वाचताना वाचक गुंतून जातो व रममाण होतो.
(iv) कथेची थोरली बहीण कोण?
उत्तर:
कथेची थोरली बहीण कादंबरी होय.
प्रश्न 3
Maharashtra Board Solution
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा. (i) …………………………… म्हणजे खरं तर मोठी कथाच; पण माझा आवाका कथेपेक्षा पार मोठा! (कथा, निबंध, कादंबरी, संवाद) (ii) साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानाचा …………………………… पुरस्कार वि. स. खांडेकर यांच्या ययाति या कादंबरीला मिळाला. (अर्जुन, ज्ञानपीठ, साहित्य) (iii) कवितेची शब्दरचना अर्थपूर्ण व …………………………… असते. (चपखल, लयबद्ध, वैशिष्ट्यपूर्ण, आशययुक्त) (iv) उत्तम …………………………… तंत्रामुळे मी खुलत जाते, रंगत जाते किंबहुना उत्तम निवेदनतंत्राचा वापर हे माझ्या यशाचं रहस्य. (भाषण, कथन, निवेदन, अनुवादन)
Solution & Step-by-Step Answer:
(i) कादंबरी (ii) ज्ञानपीठ (iii) चपखल (iv) निवेदन
कृती २ : आकलन कृती
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
आकृतिबंध पूर्ण करा. उत्तरः |

प्रश्न 2
Maharashtra Board Solution
सकारण लिहा. |
(i) कवितांची व आपली फार पूर्वीपासून चांगलीच ओळख आहे.
शालेय जीवनात पाठ्यपुस्तकातील सगळ्या कविता तालासुरांत म्हटल्या जातात.
(ii) मराठी माणसांचा ऊर अभिमानानं भरून आला.
उत्तरः
साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानाचा ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार वि. स. खांडेकर यांच्या ‘ययाति’ या कादंबरीला मिळाला.
प्रश्न 3
Maharashtra Board Solution
चूक की बरोबर ते लिहा.
(i) ‘ही आवडते मज मनापासुनी शाळा’ आणि ‘श्रावणमासी हर्ष मानसी’ या सुश्रुतच्या नावडत्या कविता होत्या.
Solution & Step-by-Step Answer:
(i) चूक
(ii) बरोबर कृती ३ : स्वमत
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
तुम्ही दूरदर्शनवर किंवा प्रत्यक्षात पाहिलेल्या काव्य संमेलनाविषयी तुमचे मत लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
होळीच्या निमित्ताने भरलेल्या काव्यसंमेलनास मला प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचा योग आला. मोठ्या व्यासपीठावर अनेक कवी, कवयित्री विराजमान होते. प्रत्येक जण आपली कविता विशिष्ट हावभावांसहित, चालीत म्हणून दाखवीत होते. कवितांची रचना अर्थपूर्ण व चपखल होती. कल्पनांचा सुंदर आविष्कार होता. काही कविता सामाजिक होत्या तर काही कविता हास्यरसपूर्ण होत्या. श्रोते मनापासून कवितांना दाद देत होते. कवीच्या आवाजातील चढउतार, त्यांचे हावभाव कौतुकास्पद होते. काही कवितांमध्ये अनुप्रासामुळे गोडवा होता. उत्प्रेक्षा, उपमा, रूपक अलंकारांनी सजलेल्या या कविता मनाला मोहून गेल्या. काव्यसंमेलन कधी संपले ते कळले नाही. कविता गुणगुणतच आम्ही बाहेर पडलो.
कृती १ : आकलन कृती
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
आकृतिबंध पूर्ण करा. उत्तरः |


प्रश्न 2
Maharashtra Board Solution
खालील प्रश्नांची
Solution & Step-by-Step Answer:
े एका वाक्यात लिहा.
|
(i) सामान्य लोकांची मते कशी बदलतात?
चरित्र वाचनाने सामान्य लोकांची मते बदलतात,
(ii) चरित्र कसे असते?
उत्तर:
चरित्र संघर्षमय, कर्तृत्ववान, संधीचे सुवर्णसंधीत रूपांतर करणारे असते.
(iii) चरित्र कसे जन्माला येते?
उत्तर:
एखादया थोर व्यक्तिमत्त्वाच्या आयुष्याची गाथा लिहिण्याची प्रेरणा लेखकाला मिळते व चरित्र जन्माला येते.
(iv) नाटककाराची कोणती अपेक्षा असते?
उत्तरः
नाटक वाचनीय आणि प्रेक्षणीय व्हावं अशी नाटककाराची अपेक्षा असते.
प्रश्न 3
Maharashtra Board Solution
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा. (i) …………………………. नाटकाचे लेखक वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कवीवर्य कुसुमाग्रज. (‘नटसम्राट’, ‘विठ्ठल तो आला’, ‘गिधाड’, ‘कुलांगार’) (ii) माझं रंगमंचावर सादरीकरण होणार याचे भान ठेवूनच …………………………. माझी मांडणी करतो. (कादंबरीकार, कथाकार, कविताकार, नाटककार)
Solution & Step-by-Step Answer:
(i) ‘नटसम्राट’ (ii) नाटककार
कृती २ : आकलन कृती
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
कारणे शोधा. |
(i) नाटक मराठी माणसाच्या हृदयात अढळ स्थान प्राप्त करते कारण...
उत्तरः
पात्ररचना, चुरचुरीत संवाद आणि नाट्यमय घटना प्रसंग यांमुळे नाटक मराठी माणसाच्या हृदयात अढळ स्थान प्राप्त करते.
(ii) २७ फेब्रुवारीला मराठी दिन साजरा करतात कारण...
२७ फेब्रुवारी हा ‘ज्ञानपीठ’ पुरस्काराचे मानकरी कविवर्य कुसुमाग्रज म्हणजे वि.वा.शिरवाडकर यांचा जन्मदिन आहे. त्यांच्या साहित्य सेवेमुळेच त्यांचा जन्मदिवस मराठी दिन म्हणून साजरा करतात.
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
वर्गीकरण करा. वसंत कानेटकर, रणजित देसाई, पु.ल. देशपांडे, धनंजय गाडगीळ, प्र.के. अत्रे, भा.द.खेर, राम गणेश गडकरी, मधुसुदन कालेलकर, बाबासाहेब पुरंदरे
Solution & Step-by-Step Answer:
ः
प्रश्न 3
Maharashtra Board Solution
योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. (i) संतकाव्यापासून पंतकाव्य, मध्ययुगीन काव्य, शाहिरी काव्य अशी वळणे घेत आधुनिक काळात मी … (अ) मुक्त छंदाचे रूप धारण केले आहे. (आ) करूण रसाचे रूप धारण केले आहे. (इ) अभंग छंदाचे रूप धारण केले आहे. (ई) मुक्त छंदाचे रूप स्वीकारले आहे
Solution & Step-by-Step Answer:
संतकाव्यापासून पंतकाव्य, मध्ययुगीन काव्य, शाहिरी काव्य अशी वळणे घेत आधुनिक काळात मी मुक्त छंदाचे रूप धारण केले आहे.
प्रश्न 4
Maharashtra Board Solution
चूक की बरोबर लिहा. (i) ‘नटसम्राट’ नाटकाचे लेखक कुसुमाग्रज म्हणजेच वि. वा. शिरवाडकर. (ii) थोरांची चरित्रे सामान्यांना धोका देतात.
Solution & Step-by-Step Answer:
(i) बरोबर (ii) चूक
कृती ३ : स्वमत
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
‘नाटक कलाकाराला घडवते’ याचे समर्थन करणारे विचार तुमच्या शब्दांत मांडा. उत्तरः साहित्यप्रकारातील ‘नाटक’ हा भाग म्हणजे विलक्षण आव्हानात्मक, नाट्यसंहिता लिहिण्यापासून ते थेट रंगमंचापर्यंतचा नाटकाचा प्रवास हा विविधांगी असतो. उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दिग्दर्शन व उत्कृष्ट अभिनय यावर नाटकाचे यश अवलंबून असते, नाटकात काम करणारे कलाकार शब्दांना मूर्तरूप देतात. प्रेक्षकांच्या मनावर पकड करतात. संवादफेक, शब्दांचे उच्चार, आवाजातील चढ-उतार, नाटकाचा आशय व त्यातून समाजाला मिळणारा संदेश याची जबाबदारी कलाकारावर असते. कलाकार त्या भूमिकेत मनापासून शिरल्याखेरीज ती भूमिका प्रभावी होत नाही. नाटक कलाकाराच्या रोमारोमांत भिनलेले असते. म्हणून नाटक कलाकाराची सर्वांगीण प्रगती करते व त्याला घडवते. |
प्रश्न ४. खालील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. |
कृती १ : आकलन कृती
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
आकृतिबंध पूर्ण करा.
Solution & Step-by-Step Answer:
ः
|


प्रश्न 2
Maharashtra Board Solution
मी कोण ते लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
ः (i) एखादया व्यक्तिच्या आयुष्याचे वर्णन – [चरित्र] (ii) स्वत:च्या जीवनप्रवासाचे तटस्थपणे केलेले वर्णन – [आत्मचरित्र]
|
प्रश्न 3
Maharashtra Board Solution
खालील प्रश्नांची
Solution & Step-by-Step Answer:
े एका वाक्यात लिहा.
|
(i) आत्मचरित्रात तटस्थपणे कशाचे कथन आढळते?
उत्तरः
आत्मचरित्रात आयुष्यात आलेल्या विविध टप्प्यांचे, वळणांचे, भल्याबुऱ्या अनुभवांचे तटस्थपणे केलेले कथन आढळते.
(ii) घरी बसून दूरच्या गावी नेणारे कोण असते?
उत्तरः
घरी बसून दूरच्या गावी नेणारे प्रवासवर्णन असते.
(iii) प्रवासवर्णनात लेखकाचे कसब कोणते?
उत्तरः
माहिती रटाळ, कंटाळवाणी न होऊ देता रंजक पद्धतीने मनोवेधक भाषेत मांडणं हे लेखकाचं कसब असतं.
(iv) सर्व साहित्य मित्रांमुळे सुश्रुतला काय फायदा होणार आहे ?
उत्तरः
सर्व साहित्य मित्रांमुळे मनोरंजन होऊन ज्ञानही वाढेल व लेखनही सुधारेल.
कृती २: आकलन
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
आकृती पूर्ण करा.
Solution & Step-by-Step Answer:
ः
|

प्रश्न 2
Maharashtra Board Solution
सकारण लिहा. प्रवासवर्णन रंजक होते –
Solution & Step-by-Step Answer:
ः लेखक त्या ठिकाणच्या माहितीबरोबर स्वत:चे अनुभव, भावना, निसर्गसौंदर्य, व्यक्तिविशेष यांची सुरेख मांडणी करतो.
|
प्रश्न 3
Maharashtra Board Solution
योग्य पर्याय निवडा. (i) सुश्रुतला साहित्य मित्रांशी मैत्री करायला आवडेल कारण... (अ) ते सुश्रुतला बक्षिस देतील. (ब) ते सुश्रुतला कधीच सोडून जाणार नाही. (क) ते सप्तरंगी इंद्रधनुष्यासारखे आहेत. (ड) ते सुश्रुतशी खेळतील.
Solution & Step-by-Step Answer:
ः सुश्रुतला साहित्य मित्रांशी मैत्री करायला आवडेल कारण ते सुश्रुतला कधीच सोडून जाणार नाही.
|
(ii) मी प्रेक्षणीय ठिकाणांची माहिती वाचकांपर्यंत पोहोचवतो –
(अ) लेखक
(ब) कवी
(क) चित्रकार
(ड) प्रवासवर्णन
उत्तरः
मी प्रेक्षणीय ठिकाणांची माहिती वाचकांपर्यंत पोहोचवतोप्रवासवर्णन.
प्रश्न 4
Maharashtra Board Solution
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा. (i) …………………………….. रंग विविध हे, भुलविती साऱ्या रसिकजना. (विषयाचे, साहित्याचे, कथेचे, निबंधाचे) (ii) धन्य आमुची …………………………….. मराठी, धन्य साहित्यसंपदा. (माय, मातृ, श्रेष्ठ, कनिष्ठ)
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
(i) साहित्याचे (ii) माय
कृती ३ : स्वमत
जसा आरसा जे आहे तसेच दाखवतो तसेच आत्मचरित्र ही घडलेल्या घटना अतिरंजीत न करता जशाच्या तशा दाखवते. त्यात लेखकाचा संघर्ष असू शकतो, त्याचे कर्तृत्व, त्याचा मान-अपमान व त्याची गुणवैशिष्ट्ये आत्मचरित्रातून दिसतात. अनेक आत्मचरित्रे बोधप्रद असतात. त्यातून जिद्द, चिकाटी, सच्चेपणा हे गुण शिकता येतात. मी स्वातंत्र्यवीर सावरकर व गांधीजीचे चरित्र वाचले आहे. खरोखरच आत्मचरित्र म्हणजे लेखकाच्या जीवनाचा आरसा असतो हे तेव्हा उमगले. स्वाध्याय कृती (७) स्वमत (i) पुस्तकाशी मैत्री करण्याचे फायदे. (ii) तुम्हांला आवडलेल्या कोणत्याही साहित्यप्रकाराची वैशिष्ट्ये तुमच्या शब्दात लिहा. (iii) ‘उत्तम लेखक होण्यासाठी उत्तम वाचक होणे आवश्यक असते’ यावर तुमचे विचार स्पष्ट करा. रंग साहित्याचे Summary in Marathi रंग साहित्याचे पाठपरिचय
रंग साहित्याचे Summary in English Every language is enhanced by a body of literature. When different types of literature take human form and introduce themselves, they add to the beauty of language. The various characteristics of literature help in this process. If we get acquainted with these literary types, we not only get entertained but also acquire a fair amount of knowledge. This message is conveyed through this lesson. This animated lesson introduces us to various types of literary divisions. रंग साहित्याचे शब्दार्थ |
